सनी लिओनीला जिममध्ये ही गोष्ट देतेय त्रास, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 05:13 PM2018-04-28T17:13:16+5:302018-04-28T17:18:09+5:30

जिममधील या गोष्टीमुळे कंटाळी आहे सनी लिओनी

sunny leone gym instructor lian wentzel maintaing body tough exercise | सनी लिओनीला जिममध्ये ही गोष्ट देतेय त्रास, पाहा व्हिडीओ

सनी लिओनीला जिममध्ये ही गोष्ट देतेय त्रास, पाहा व्हिडीओ

Next

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनं आपल्या मनमोहक, घायाळ करणाऱ्या अदांनी आणि परफेक्ट फिगरमुळे सिनेसृष्टीमध्ये स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली आहे. फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी सनीला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. नुकतंच सनीनं जिममधील व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिनं जिममध्ये व्यायाम करताना निर्माण झालेली अडचण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  

या व्हिडीओमध्ये सनी लिओनी एका मोठ्या बॉक्सला ढकलताना दिसत आहे. या बॉक्सला पुढे ढकलण्यासाठी सनी प्रचंड मेहनत घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 

'हा बॉक्स खूपच वजनदार आहे, तो सहजपणे ढकलला जात नव्हता. पुढील वेळेस मला यापेक्षा हलका बॉक्स पाहिजे...' असे कॅप्शन सनीनं व्हिडीओला दिले आहे.  दरम्यान, फिटनेससाठी सनी आपला अधिक वेळ जिममध्येच घालवते. जे अधिक व्यायाम करुन घेतली अशाच इन्स्ट्रक्टरकडे सनी जाणं पसंत करते. फिगर मेन्टेन राहावी, यासाठी इन्स्ट्रक्टर सनीला अनेक प्रकारचे व्यायाम शिकवतात. 
 
 

Web Title: sunny leone gym instructor lian wentzel maintaing body tough exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.