Join us

'लोकमत'ची सुपर (VOTE) कार निघाली... तुम्ही येताय ना ? महाराष्ट्राच्या मतदारसंघांमध्ये जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 6:23 AM

व्यूहरचनेचे अंडरकरंट्स जाणून घेत लोकमताचा आवाज होणार!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सर्व घडामोडी, पडद्यामागच्या बातम्या आणि सखोल विश्लेषणं 'लोकमत' आणि 'लोकमत डॉट कॉम' आपल्या वाचकांना आणि प्रेक्षकांना देत आहे. महायुती आणि महाआघाडीच्या हालचालींवर आमचं बारीक लक्ष आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय चाललंय, हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत कुणाला' ही व्हिडीओ सीरिज आमच्या यू-ट्युब चॅनलवर, फेसबुक पेजवर चालवत आहोत. त्यातच एक पाऊल पुढे टाकत, 'लोकमत सुपर (व्होट) कार' शनिवारी राज्याच्या दौऱ्यावर निघाली आहे. थेट लोकांमध्ये जाऊन, त्यांना मनातलं बेधडक बोलण्यासाठी 'माईक'देणं, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

महाराष्ट्रात यावेळी काय होणार, याबद्दल देशभरात उत्सुकता आहे. त्यातच, पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला आहे. हे लक्षात घेऊनच, 'लोकमत सुपर (व्होट) कार' मुंबईहून निघून थेट बारामतीला पोहोचली आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या 'मतसंग्रामा'कडे बारामतीकर कसं बघताहेत, कुणी कशी व्यूहरचना केली आहे, अंडरकरंट्स काय आहेत, हे आम्ही तिथे जाणून घेणार आहोत. त्यानंतर, सातारा, माढा, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सिंधुदुर्ग, रायगड या चर्चेतील मतदारसंघांमध्ये ही सुपर (व्होट) कार जाणार आहे.

दुसरी सुपर (व्होट) कार रविवारी मुंबईहून निघून 'मराठवाडा व्हाया उत्तर महाराष्ट्र असा प्रवास करणार आहे. सामान्य लोकांसोबतच प्रमुख नेत्यांच्या, उमेदवारांच्या मुलाखतीही या दौऱ्यात आम्ही घेणार आहोत. शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यामध्ये ही कार दाखल होईल.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४लोकमत