Join us

एप्रिल महिन्यात एसी लोकल कमाईत ठरली सुपरफास्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 6:38 AM

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलने एप्रिल महिन्यात भरघोस कमाई केली आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांची भर पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा केली आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलने एप्रिल महिन्यात भरघोस कमाई केली आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान एकूण १ कोटी ८४ लाख रुपयांची भर पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा केली आहे. ही कमाई एसी लोकल सुरू झाल्यापासून सर्वाधिक असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील विक्रम झाला आहे.मुंबईत एप्रिल महिन्यात सरासरी ३३ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान होते. उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला. एप्रिल महिन्यात तब्बल ४ लाख ४७ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने १ कोटी ८४ लाख रुपये पश्चिम रेल्वेच्य तिजोरीत जमा झाले. एप्रिलमध्ये एका दिवसाला सरासरी १४ हजार ९०० प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास केला.पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल २५ डिसेंबर २०१७ रोजी धावली. हा थंडगार प्रवास मुंबईकरांना आवडल्याने १६ महिन्यांत एसी लोकलने २४ कोटींची कमाई केली.आॅक्टोबर २०१८ हा एसी लोकलचा एप्रिलनंतरचा सर्वाधिक कमाईचा दुसरा महिना आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये १ कोटी ८२ लाखांची कमाई पश्चिम रेल्वेने केली. तर मे २०१८ महिना हा सर्वाधिक कमाईचा तिसरा महिना असून या महिन्यात १ कोटी ६८ लाखांची कमाई केली.मे २०१९ मध्ये तापमान वाढल्याने मे महिन्यात एप्रिल महिन्याचा १ कोटी ८४ लाखांचा विक्रम मोडीत काढला जाण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली आहे.एसी लोकलचा तिकीट दर साधारणत: साठ रुपयांपासून ते २०५ रुपयांपर्यंत आहेत. हे दर नॉन एसीच्या प्रथम वर्गाच्या तिकीट दरापेक्षा १.२ पट अधिक आहेत. हा दर १.३ पट करण्यात येणार आहे. मात्र तूर्तास ३१ मे २०१९ पर्यंत एसी लोकलची दरवाढ करण्यात येणार नाही.वाढत्या उकाड्यामुळे एसी लोकलला पसंतीएसी लोकलमध्ये सुरक्षा यंत्रणा उत्तम असल्याने मुंबईकर एसी लोकलच्या प्रेमात पडले. आॅटोमॅटीक दरवाजे, आरामदायक आसन व्यवस्था, प्रत्येक बोगीत अग्निशमन यंत्रणा, जीपीएस सुविधा, प्रवासी संवाद, एलईडी वीज सुविधा, १०० किमी प्रति तास गती, साप्ताहिक आणि पाक्षिक पास काढण्याची सुविधा तसेच वाढत्या उकाड्यामुळेदेखील एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.12डब्यांच्या एसी लोकलच्या दिवसातून १२ फेºया होतात. एसी लोकल सहा चर्चगेट दिशेकडे आणि सहा विरार दिशेकडे चालविण्यात येत आहेत. महालक्ष्मी ते बोरीवली एक लोकल धिमी असून ११ जलद लोकल आहेत. २०१८-१९ या वर्षात एसी लोकलमधून एका दिवसाला सरासरी १७ हजार ८७२ प्रवाशांनी प्रवास केला असून एका महिन्याला ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात.

टॅग्स :एसी लोकलमुंबई