सोमवारी सुपरमून!

By admin | Published: September 25, 2015 03:12 AM2015-09-25T03:12:05+5:302015-09-25T03:12:05+5:30

भाद्रपद पौणिर्मेच्या दिवशी म्हणजेच सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण असा योग आला आहे. यापूर्वी १९८२मध्ये असा योग आला होता

Supermon on Monday! | सोमवारी सुपरमून!

सोमवारी सुपरमून!

Next

मुंबई : भाद्रपद पौणिर्मेच्या दिवशी म्हणजेच सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण असा योग आला आहे. यापूर्वी १९८२मध्ये असा योग आला होता. यानंतर असा योग आणखी १८ वर्षांनी २०३३मध्ये येणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, याआधी १९१०, १९२८, १९४६ आणि १९८२मध्ये चंद्रग्रहण आणि सुपरमून असा योग आला होता. चंद्र पृथ्वीपासून सरसरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. चंद्र ज्या वेळी पृथ्वीच्या जास्त जवळ येतो आणि पौर्णिमा असते त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात.
सोमवारी चंद्र्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. सोमवारी पहाटे ६ वाजेपर्यंत सुपरमूनचे दर्शन घेता येईल. मात्र त्या वेळी आकाश निरभ्र असावयास हवे. तेजस्वी चंद्रबिंब १४ टक्के मोठे दिसेल. सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४६ मिनिटांनी पूर्वेला चंद्रोदय होईल आणि रात्रभर आकाशात त्याचे दर्शन घेता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Supermon on Monday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.