पर्यवेक्षकांनीच पळवली पारलेची बिस्किटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:15 AM2018-04-20T02:15:47+5:302018-04-20T02:15:47+5:30

भांडुप गोडाऊनमधील ५७ लाखांची बिस्किटे पळविल्याचे उघडकीस आले आहे.

Supervisor escaped with biscuits | पर्यवेक्षकांनीच पळवली पारलेची बिस्किटे

पर्यवेक्षकांनीच पळवली पारलेची बिस्किटे

Next

मुंबई : पारले कंपनीची उत्पादने वितरित करण्याचे काम घेतलेल्या खासगी कंपनीच्या पर्यवेक्षकांनीच भांडुप गोडाऊनमधील ५७ लाखांची बिस्किटे पळविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी बुधवारी तिघांना अटक केली. तिघेही वर्षभर गोडाऊनमधील बिस्किटांची चोरी करत होते.
मुलुंडचे रहिवासी चिंतन व्यास (३५) यांची विनायक एजन्सी नावाची खाजगी कंपनी आहे. पारले कंपनीकडून त्यांना पारलेचे उत्पादन वितरित करण्याचे कंत्राट मिळाले. हे उत्पादन भांडुपच्या ईश्वरनगर येथील गोडाऊनमध्ये जमा होत असे. व्यास यांनी संजय सरोज, भरत चतुर्वेदी, सुनील पंगेरकर, संजय मोरे यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यांनीच ५७ लाखांची बिस्किटे पळवल्याचे उघडकीस आले आहे. ही मंडळी गोडाऊनमधील माल चोरून बाहेर विकत होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी बुधवारी तिघांना अटक केली.

Web Title: Supervisor escaped with biscuits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा