Join us

पर्यवेक्षकांनीच पळवली पारलेची बिस्किटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:15 AM

भांडुप गोडाऊनमधील ५७ लाखांची बिस्किटे पळविल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई : पारले कंपनीची उत्पादने वितरित करण्याचे काम घेतलेल्या खासगी कंपनीच्या पर्यवेक्षकांनीच भांडुप गोडाऊनमधील ५७ लाखांची बिस्किटे पळविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी बुधवारी तिघांना अटक केली. तिघेही वर्षभर गोडाऊनमधील बिस्किटांची चोरी करत होते.मुलुंडचे रहिवासी चिंतन व्यास (३५) यांची विनायक एजन्सी नावाची खाजगी कंपनी आहे. पारले कंपनीकडून त्यांना पारलेचे उत्पादन वितरित करण्याचे कंत्राट मिळाले. हे उत्पादन भांडुपच्या ईश्वरनगर येथील गोडाऊनमध्ये जमा होत असे. व्यास यांनी संजय सरोज, भरत चतुर्वेदी, सुनील पंगेरकर, संजय मोरे यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले होते. मात्र त्यांनीच ५७ लाखांची बिस्किटे पळवल्याचे उघडकीस आले आहे. ही मंडळी गोडाऊनमधील माल चोरून बाहेर विकत होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी बुधवारी तिघांना अटक केली.

टॅग्स :गुन्हा