पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रावर मोबाइल बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:15 AM2019-03-06T06:15:17+5:302019-03-06T06:15:23+5:30
वर्गात मोबाइल आणण्यास बंदी घातल्यानंतर आता पर्यवेक्षकांनाही मोबाइलबंदीच्या सूचना दिल्याचा संदेश सध्या मुंबई विभागीय मंडळात शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत आहे.
मुंबई : परीक्षा काळात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्गात मोबाइल आणण्यास बंदी घातल्यानंतर आता पर्यवेक्षकांनाही मोबाइलबंदीच्या सूचना दिल्याचा संदेश सध्या मुंबई विभागीय मंडळात शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत आहे.
मात्र, पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या मोबाइल बंदीच्या सूचनेप्रमाणेच ही सूचना असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी स्पष्ट केले.
परीक्षेसाठी असलेले कर्मचारी वगळता अन्य कर्मचारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा अन्य कुणीही परीक्षा केंद्रावर थांबणार नाही याची नोंद घ्यावी, असे संदेश शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या व्हॉट्सअॅपवर सोमवारी दिवसभर व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ही दरवर्षी देण्यात येणाऱ्या सूचनेप्रमाणेच सूचना असल्याचे स्पष्टीकरण मंडळाने केले आहे.
इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपी
मंगळवारी झालेल्या दहावीच्या इंग्रजीच्या पेपरला मुंबई विभागातून ५ कॉपीची प्रकरणे समोर आल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाकडून मिळाली आहे.
>उत्तरपत्रिका गहाळ
दहावीच्या एका विद्यार्थिनीची मराठी विषयाची उत्तरपत्रिका मागील शनिवारी केंद्राकडून गहाळ झाल्याचा प्रकार कुर्ला पश्चिम येथे उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित केंद्राने पोलीस ठाण्यात उत्तरपत्रिका गहाळ झाल्याची तक्रार दाखल केल्याची माहिती कुर्ला पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाºयाने दिली.
>समस्या आल्यास संपर्क साधा
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात परीक्षेसंदर्भात समस्या, अडचण आल्यास त्यांनी ’ङ्म‘ें३८४५ँ्र१्र@ॅें्र’.ूङ्मे या ‘लोकमत’च्या इमेल आयडीवर संपर्क साधावा.