सुपरवोटसाठी किंवा वेस्टर्न....वसार्ेवा विधानसभा मतदार संघ.....

By Admin | Published: September 1, 2014 08:01 PM2014-09-01T20:01:23+5:302014-09-01T20:01:23+5:30

सुपरवोटसाठी किंवा वेस्टर्न .....रामदास संधे यांचा फोटो मेलवर अहे.....

Supervot or Western ... Vasareva Assembly Constituency ..... | सुपरवोटसाठी किंवा वेस्टर्न....वसार्ेवा विधानसभा मतदार संघ.....

सुपरवोटसाठी किंवा वेस्टर्न....वसार्ेवा विधानसभा मतदार संघ.....

Next
परवोटसाठी किंवा वेस्टर्न .....रामदास संधे यांचा फोटो मेलवर अहे.....

कोळी समाजाला हवा वसार्ेवा विधानसभा मतदार संघ

विद्यमान आमदार बलदेव खोसा यांची कसोटी
मनोहर कुंभेजकर / अंधेरी:
काँग्रेसच्या व्यवसायिक मच्छीमार सेलचे अध्यक्ष आणि वेसाव्याचे मूळ नागरिक असलेल्या रामदास संधे यांनी वसार्ेवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाकडे अर्ज सादर केला आहे. वसार्ेवा विधानसभा मतदारसंघातून मच्छिमार समाजाला उमेदवारी मिळावी, यासाठी मच्छीमार समाज प्रयत्नशील आहे. त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आ. बलदेव खोसा यांच्यासमोर उमेदवारी मिळवण्याचे मोठे आव्हान आहे.
पूर्वीच्या आंबोली मतदारसंघातून बलदेव खोसा यांनी तीनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. शिवाय मतदारसंघाच्या विभागणीनंतरही ते दोन टर्मपासून आमदार आहेत. फारसा प्रभाव पाडू न शकलेल्या खोसा यांना कितीवेळा उमेदवारी देणार, असा सवाल मच्छिमार नागरिक उपस्थित करत आहेत. शिवाय खासदार गजानन कीर्तीकर यांना मतदारसंघातून मिळालेली १० हजार ५०० मतांची आघाडी खोसा भरुन कशी काढणार, हा त्यांना सतावणारा मोठा प्रश्न आहे.
आजवर राजकीय प्रतिनिधित्व न मिळालेल्या आणि असंख्य प्रश्नांनी बेजार असलेल्या मच्छिमार समाजातील युवक आणि महिलांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी वेसावे कोळीवाड्यातील भेटीत दिले होते. तेव्हापासून मच्छिमार समाजाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या व्यावसायिक मच्छिमार सेलचे अध्यक्ष असलेल्या रामदास संधे यांना उमेदवारी देण्याची मागणी मच्छिमार समाजातून होत आहे. एकूणच बलदेव खोसा यांना अस्तित्वासाठी आता झुंज द्यावी लागणार हे स्पष्टच आहे.

Web Title: Supervot or Western ... Vasareva Assembly Constituency .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.