जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:36+5:302021-09-24T04:07:36+5:30

- पीयूष गोयल; मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीचे ...

Supply chain due to globalization | जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळीचे

जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळीचे

Next

- पीयूष गोयल; मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीचे एकमेकांवरील अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे पॅकेजिंग, संशोधन आणि सामग्रीची वाहतूक करण्यासाठी सर्वोत्तम उपाय, प्रभावी साठवणूक व्यवस्थेसह इतर सुविधांमध्ये मूल्यवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. ती गरज पूर्ण करण्याची क्षमता औद्योगिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रात आहे. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेत (एन.आय.टी.आय.ई.) तुम्ही ज्या प्रकारे काम करत आहात, त्याद्वारे या देशाचे भवितव्य बदलू शकता, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काढले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एनआयटीआयई संस्थेमधील मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. लॉजिस्टिक्स क्षेत्र किफायतशीर आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी, नवे रोजगार निर्माण करण्यासाठी, निर्यात वाढ, बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्यासाठी या गुणवत्ता केंद्राचा खूप उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी खासदार गोपाल शेट्टी, एनआयटीआयईचे संचालक प्रा. मनोज के. तिवारी आणि विद्याशाखेतील प्रतिनिधी उपस्थित होते.

.....

वैशिष्ट्ये काय?

- जागतिक पातळीवरील स्पर्धा आणि आर्थिक संकटांनी निर्माण केलेल्या आव्हानांमुळे पुरवठा साखळीचे व्यवस्थापन अधिकाधिक जटिल होत आहे. अशा परिस्थितीत मालवाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनातील अत्याधुनिक संशोधन, ज्ञानवर्धन आणि क्षमता बांधणीसाठी हे केंद्र उपयोजित संशोधन आणि विकासविषयक उपक्रमांच्या माध्यमातून योगदान देईल.

- या क्षेत्रातील आधुनिक ज्ञान वितरित करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, यांत्रिक शिक्षण साधने आणि डिजिटल नियंत्रणाच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या मालवाहतूक व्यवहारांचे परीक्षण आणि विश्लेषण अधिक सशक्त करण्यासाठी हे केंद्र एक प्रेरक शक्ती म्हणून काम करेल.

Web Title: Supply chain due to globalization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.