Join us

कोरोना साथीच्या काळातही पुरवठा साखळी अखंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६२.०२ दशलक्ष टन मालवाहतूक केली. मार्च २०२१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वेने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६२.०२ दशलक्ष टन मालवाहतूक केली. मार्च २०२१ मध्ये एकूण ६.९५ दशलक्ष टन लोडिंग झाली जी आतापर्यंतच्या मागील सर्वोत्तम मासिक ६.२२ दशलक्ष टनापेक्षा जास्त आहे.

मध्य रेल्वेची ३१ मार्च २०२१ रोजी झालेली ५,८८४ वॅगन्सची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट लोडिंग ३१ मार्च २०१८ रोजी झालेल्या मागील सर्वोत्तम ५,०१४ वॅगन्सपेक्षा अधिक आहे. कोरोना साथीच्या काळातही पुरवठा साखळी अखंडित ठेवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अत्याधिक प्रयत्न केले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ३१ मार्च २०२१ रोजी एका दिवसात १,९०० वॅगन्सची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट लोडिंग साध्य केली आहे.

३१ मार्च २०२१ रोजी ५,८८४ वॅगन्सची आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग झाली जी ३१ मार्च २०१८ रोजी करण्यात आलेल्या ५,०१४ वॅगन्सच्या सर्वोत्कृष्ट लोडिंगच्या उच्चांकापेक्षा अधिक आहे. मुंबई विभागाने ३१ मार्च २०२१ रोजी १,९०० वॅगन्सची आतापर्यंतची बेस्ट लोडिंग साध्य केली

--------------

विभागनिहाय मालवाहतूक लोडिंग कामगिरी (आर्थिक वर्ष २०२०-२१)

नागपूर - ३३.५१ दशलक्ष टन

मुंबई - १६.०८ दशलक्ष टन

भुसावळ - ५.७७ दशलक्ष टन

सोलापूर - ५.३७ दशलक्ष टन

पुणे - १.२९ दशलक्ष टन

--------------