म्हाडाचा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार

By Admin | Published: October 17, 2015 02:33 AM2015-10-17T02:33:03+5:302015-10-17T02:33:03+5:30

म्हाडाच्या सेवेत असताना घरातील कर्तबगाराचे निधन झाल्याने अनेक कुटुंबांचा आधारवड कोसळला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर म्हाडामध्ये

Support for families of MHADA employees | म्हाडाचा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार

म्हाडाचा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्या सेवेत असताना घरातील कर्तबगाराचे निधन झाल्याने अनेक कुटुंबांचा आधारवड कोसळला होता. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर म्हाडामध्ये नोकरी देऊन म्हाडाने त्यांना आधार दिला आहे. शुक्रवारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते म्हाडातील मयत कर्मचाऱ्यांच्या १५ वारसांना नोकरीसाठीचे नियुक्तिपत्र देण्यात आले.
म्हाडातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तिपत्र देणे तसेच मुंबई मंडळाच्या विविध सोडतींमधील ९९९ अर्जदारांना १० महिन्यांच्या कालावधीत सदनिकेचे वितरण झाल्यानंतर १000व्या लाभार्थ्याला सदनिकेचे चावीवाटप व ताबापत्र देण्यासाठी म्हाडा मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी बोलताना म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. झेंडे
म्हणाले की, शासन निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी गट
‘क’ व गट ‘ड’मध्ये प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या १० टक्के इतकी मर्यादा विहित करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीने कार्यवाही करीत म्हाडातील १५
मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना
आज नियुक्तिपत्र देण्यात येत
आहे. त्याचबरोबर २0१४पर्यंतची म्हाडातील अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षार्थींची यादी संपुष्टात आल्याने समाधान वाटत असल्याचेही ते म्हणाले.
सेवेत असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आमचा आधारवड कोसळला. घरची आर्थिक परिस्थिती खालावली. मात्र, मी अनुकंपा तत्त्वावर म्हाडात नोकरीला लागल्यामुळे आता आमच्या कुटुंबाला आधार मिळाला असल्याची भावना अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती मिळालेल्या महेश नांदे यांनी या वेळी व्यक्त केली.

Web Title: Support for families of MHADA employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.