Join us  

स्पेशल स्कूलच्या मुलांच्या पिकनिकला जॉय संस्थेचे सहकार्य 

By मनोहर कुंभेजकर | Published: February 18, 2024 6:33 PM

विविध जाती धर्मातील दिव्यांग आणि इतर डीसएबल अशी एकूण सहा ते चौदा वयोगटातील ८५ मुलं शिकतात.

मुंबई: जुहू येथील दिलखूष या स्पेशल स्कूल मध्ये विविध जाती धर्मातील दिव्यांग आणि इतर डीसएबल अशी एकूण सहा ते चौदा वयोगटातील ८५ मुलं शिकतात. त्यांची पिकनिक येत्या दि,२६ फेब्रुवारी रोजी जाणार आहे. पण यातील ३० विद्यार्थी असे आहेत की ते अतंत्य गरीब कुटुंबातून येतात आणि त्यांच्याकडे पिकनिकला जाण्यासाठी पैसे नव्हते.

अशावेळी मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेने या तीस मुलांचे  ५५०/- रुपये प्रमाणे १६५००/- रूपये नुकतेच येथील विनीता परेरा यांच्याकडे धनादेश द्वारे सुपूर्द केले .यावेळी जॉयचे संस्थापक गणेश हिरवे, कार्याध्यक्ष असुंता डिसोजा आणि मुंबई अध्यक्ष चंद्रशेखर सावंत आवर्जून उपस्थित होते. जॉय संस्था मागील अनेक वर्षापासून गोर गरीब वंचित विद्यार्थी, वृध्द लोक,  नैसर्गिक आपत्ती आणि अनेक चांगली काम करत असल्याचे गणेश हिरवे यांनी सांगितले. पिकनिकला जायला मिळणार म्हणून ही मुल खुष होती. येथे स्पेशल स्कूल मुलांबरोबरच मोठी मुल देखील विविध ट्रेनिग साठी येत असून पुढे स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मुंबई