अब्दुललाटमधील अनाथ मुलांना ‘लोकमत’चे सहाय्य

By admin | Published: August 21, 2014 12:22 AM2014-08-21T00:22:37+5:302014-08-21T00:29:16+5:30

सामाजिक बांधिलकी : दहाव्या वर्धापनदिनी धान्य वाटप

Support of orphaned children in 'Abdulazal' Lokmat | अब्दुललाटमधील अनाथ मुलांना ‘लोकमत’चे सहाय्य

अब्दुललाटमधील अनाथ मुलांना ‘लोकमत’चे सहाय्य

Next

दगडू कांबळे - अब्दुललाट --पूरग्रस्त असो अथवा भुकंपग्रस्त नेहमीच लोकमत मदतीला धावून येते. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील विद्यार्थी प्रबोधिनी संचलित अनाथ व भटक्या मुलांसाठीही ‘लोकमत’ धावून आले अन् मदतीचा हात दिला. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
अब्दुललाट येथे गेल्या नऊ वर्षांपासून विद्यार्थी विकास प्रबोधिनीमार्फत अनाथ मुलांचे वसतिगृह कार्यरत आहे. सरकारच्या कोणत्याही प्रकारच्या मदती शिवाय आणि केवळ समाजातील दात्यांच्या सहकार्याने या मुलांचे पालनपोषण केले जाते. या वसतिगृहात सुमारे ४६ मुले-मुली राहतात.
२२ जुलै २०१४ रोजी ‘लोकमत’ने या संस्थेविषयी ‘सामाजिक ऋण’ या सदराखाली बातमीच्या स्वरूपात प्रकाशझोत टाकला होता, आणि त्याची खास नोंदही करून घेतली. त्यानंतर मदतीचा ओघ सुुर झाला. आज, बुधवार ‘लोकमत’चा दशकपूर्ती सोहळा. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून लोकमतच्या प्रतिनिधींनी या बालोद्यानामध्ये येऊन अन्नधान्यांचे वाटप केले आणि वर्धापनदिनानिमित्त पेढेही वाटले. प्रतिनिधींना संस्थेचे संचालक सुरेश कारदगे व देवगोंडा पाटील यांनी सर्व माहिती दिली. ग्रामीण भागात अशा सेवाभावी संस्था चालविणे म्हणजे एक कसरतच आहे. तरीही मोठ्या उमेदीने चालविलेल्या या संस्थेला ‘लोकमत’ परिवाराचे कायम सहकार्य राहील, असेही त्यांनी अभिवचन दिले.कारदगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुलांनी गीत म्हणून दाखविले. प्रणाली शिंदे या बालिकेने ‘टोमॅटो’ हे गीत गायिले. साहित्यिक आ. के. कुरुंदवाडे, अमर गडकरी, डॉ. अरुण कुलकर्णी, क. पा. बिरनाळे, कल्लाप्पा गडकरी, अनिता कोळी, अश्विनी देवमोरे, सुनील कांबळे, हर्षदा कांबळे, आदी उपस्थित होते. दीक्षा सुतार यांनी आभार मानले.

Web Title: Support of orphaned children in 'Abdulazal' Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.