मुंबई : बाकीचे पक्ष केवळ पैसे कमवतात आणि जातात मात्र सेना फक्त ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत आहे. भायखळात कुठल्याच पक्षांनी विकास केला नाही आता इथे बदलाची गरज आहे. नव्या महाराष्ट्र घडवण्यासाठी तुमची साथ हवी आहे, त्यामुळे आता इथे सेनेचा विजय पक्का असल्याचे प्रतिपादन वरळीचे सेनेचे उमेदवार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
या मतदार संघात दुसऱ्या कोणत्या पक्षाची जिंकायची हिंमत नाही आहे. प्रत्येक मतदार संघ येत्या निवडणुकीत भगवामय होणार आहे. केवळ महायुती निवडणुकीनंतरही जनतेसाठी उपलब्ध असते , बाकीचे पक्ष निवडणूकीपुरती कार्यालय थाटतात आणि बंद करतात. मात्र सेनेच्या शाखा या गल्लोगल्ली आहेत ती जनतेसाठी कायम उपलब्ध असतात. शिवसेनेने जाती, धर्माचा भेदभाव कधीच केला नाही तसे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार झाले आहेत त्यामुळे आम्ही कायमच मानवतेला प्राधान्य देऊन जनतेची कामे केली आहेत. या मतदात संघात चोवीस तास, रात्रंदिवस तुमची काम होतील याची श्वाश्वती घेतो असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.
भायखळा मतदार संघाच्या सेनेच्या सेनेच्या संघाच्या सेनेच्या सेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ आग्रीपाडा येथील जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. या सभेला काँग्रेसमधून नुकतेच सेनेत आलेले मनोज जामसुतकर, राष्ट्रवादीतून सेनेत आलेले सूर्यकांत पाटील, सेनेचे आशिष चेंबूरकर, सचिन अहिर आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, भाजपच्या शायना एन सी आणि पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते.
यावेळी, केंद्रीय अवजड मंत्री अरविंद सावंत म्हणाले की, जी माणसे धार्मिक भिंती उभ्या करत आहेत ती प्रेम, विश्वासाला आसुसलेली आहेत. त्यांना आपुलकी द्या , त्यांची कामे करून द्या तेव्हाच ही माणसे आपली होतील. शिवसेना कायम याच पद्धतीने काम करत होती, आताही करत आहेत आणि भविष्यातही करेल.
पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले की महायुतीला या ठिकाणी पहिल्यांदा सभेचा मान मिळाला आहे, बाकी कोणतेच पक्ष इथे पोहोचले नाहीत. मदनपुरा ही कोणाची जहागीर नाहीय त्यामुळे इथल्या मतदारांनीच आम्हाला आमंत्रित केले आहे. त्यांच्यासाठीच आम्ही इथे आलो आहे, त्यामुळे आता या विभागाला बदलाची गरज आहे. परिवर्तनाची नांदी आता इथेही पोहोचली आहे, अखिल भारतीय सेना , काँग्रेस आणि एमआयएम सर्व पक्षांचे आमदार इथे होऊन गेले आहेत. १० वर्ष वेगवेगळ्या माणसांना संधी दिली , विकास झाला नाही. मात्र इथल्या मतदारांसाठी इतक्या वर्षात काहीच काम केले नाही. त्यामुळे आता आम्ही या ठिकाणी बदल घडवणार आहोत. तर सेनेच्या उमेदवार यामिनी जाधव म्हणाल्या की, स्वातंत्र्यपूर्व काळात कुठे होते जात आणि धर्म त्यामुळे आपण इंग्रजाविरोधात लढाई जिंकू शकलो. नेत्याला जात, धर्म नसतो त्यामुळे तुम्हीही भावनिक होऊन मतदान करू नका. आपण आज धार्मिक भिंत मोडून एकत्र येऊया आणि माणुसकीने एकत्र येऊन प्रगती करूया.