जल शुद्धीकरण प्रकल्प वेसावकरांसाठी आधारवड

By Admin | Published: June 16, 2017 02:44 AM2017-06-16T02:44:35+5:302017-06-16T02:44:35+5:30

समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. मात्र वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी

Support for water purification projects | जल शुद्धीकरण प्रकल्प वेसावकरांसाठी आधारवड

जल शुद्धीकरण प्रकल्प वेसावकरांसाठी आधारवड

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. मात्र वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे ४५० सभासदांनी एकमताने निर्णय घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी खाऱ्या पाण्यापासून शुद्ध गोडे पाणी करण्याचा प्रकल्प गेली दीड वर्ष यशस्वीपणे चालवित आहेत.
या प्रकल्पातून रोज सुमारे ३० हजार लीटर गोड्या पाण्याची निर्मिती होत आहे. वेसावकरांच्या ३५० नौकांना मासेमारीसाठी लागणाऱ्या १२०० ते २००० लीटर पाण्याचा मोठा प्रश्नदेखील सुटला आहे. वेसावेकरांना हा प्रकल्प आधारवड ठरला असून, राज्यातील समुद्रकिनारी असलेला अशा प्रकारचा हा पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे, असे बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी सांगितले.
रोज २४ तास सुरू असलेला हा जलशुद्धीकरण प्रकल्प नोव्हेंबर २०१५मध्ये येथे सुरू केल्यानंतर मच्छीमार बांधवांना रोजगारही मिळाला. येथील मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून थेट नौकांमध्ये शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाते. केरळनंतर मासेमारीत वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो. येथील सुमारे ३५० मच्छीमार नौका सुमारे ८-१०-१२ दिवसांच्या मासेमारीसाठी खोल समुद्रात जातात. या प्रकल्पातून शुद्धीकरण प्रकल्पातून १२०० ते २००० लीटर शुद्ध पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरले जात असल्यामुळे येथील मच्छीमारांची पाणी नौकेमध्ये वाहून नेण्यासाठी होणारी मोठी दमछाक थांबली आहे. रोज खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या २० ते २२ मच्छीमार नौकांना याचा मोठा लाभ होत आहे.

एका तासाला ४५०० लीटर पाणी
वेसावे समुद्रकिनारी बाजार गल्लीजवळ १५ बाय १२च्या केबिनमध्ये सुमारे २० फुटी एक कूपनलिका बांधण्यात आली असून, त्यामधून अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्रामधून एका तासाला सुमारे ४५०० लीटर पाणी तयार होते. येथील पाच हजार लीटरच्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाते. त्यामध्ये शुद्ध पाण्याचे प्रमाण सुमारे ३००० लीटर इतके असते आणि वापरण्यास अयोग्य असलेले टाकाऊ पाणी येथील अन्य बांधकामासाठी आणि गरजू नागरिकांना वापरण्यासाठी तसेच लग्नसराईसाठी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पुरवण्यात येते, असे भावे यांनी सांगितले.

Web Title: Support for water purification projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.