सुप्रीम कोर्टाने लोकशाहीला वस्त्रहरणापासून वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:19 AM2018-05-19T05:19:11+5:302018-05-19T05:19:11+5:30

महाभारतातील द्रौपदीप्रमाणे मोदी सरकारच्या कार्यकाळात सातत्याने लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होत असून सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाने लोकशाहीचे वस्त्रहरण होण्यापासून वाचवले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

Supreme Court protects democracy from garbage | सुप्रीम कोर्टाने लोकशाहीला वस्त्रहरणापासून वाचवले

सुप्रीम कोर्टाने लोकशाहीला वस्त्रहरणापासून वाचवले

Next

मुंबई : महाभारतातील द्रौपदीप्रमाणे मोदी सरकारच्या कार्यकाळात सातत्याने लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होत असून सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाने लोकशाहीचे वस्त्रहरण होण्यापासून वाचवले, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी भाजपाने सत्ता व पैशांचा दुरुपयोग केल्याचे सांगत त्याविरोधात काँग्रेसने शुक्रवारी राज्यभर ‘प्रजातंत्र बचाओ दिवस’ पाळून सर्व जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन केले. मुंबईत आझाद मैदानाजवळील अमर जवान ज्योतीजवळ धरणे आंदोलनात खा. चव्हाण सहभागी झाले होते.
मेघालय, मणिपूर व गोवा राज्यात काँग्रेस पक्ष आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठे पक्ष असताना भाजपाने अनेक पक्षांचे कडबोळे तयार करून राज्यपालांमार्फत अनैतिक मार्गाने सत्ता हस्तगत केली, असे चव्हाण म्हणाले. मुंबईच्या धरणे आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. भाई जगताप आदी उपस्थित होते.
>निर्णयाचे स्वागत - जयंत पाटील
कर्नाटकच्या राज्यपालांना आणि केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारला ही फार मोठी चपराक आहे. १५ दिवसांनी बहुमत सिद्ध करायला देणे हा राज्यपालांचा निर्णय किती चुकीचा होता हे यावरून सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Supreme Court protects democracy from garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.