गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
By admin | Published: February 3, 2016 11:03 AM2016-02-03T11:03:24+5:302016-02-03T11:18:48+5:30
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला १४ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाचा कार्यक्रम आयोजित करायला परवानगी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला १४ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडियाचा कार्यक्रम आयोजित करायला परवानगी दिली आहे. गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम आयोजित करायला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन परवानगी मागितली होती.
‘मेक इन इंडिया’मध्ये राज्याचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १४ फेब्रुवारी रोजी ‘महाराष्ट्र नाइट’ हा सांस्कृतिक कार्यक्रम गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात येणार आहे.
देशातील व परदेशातील महत्त्वाच्या व्यक्ती येणार यासाठी यापूर्वी न्यायालयाने स्वीकारलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली होती.