Supriya Sule: कोरोना महामारीमध्ये आजवर अनेक मुलांनी आपल्या आई किंवा वडिलांना गमवाले आहे. काहींनी तर दोघांनाही गमावले आहे. अशा मुलांना आधार देण्याची गरज आहे. कोरोनामुळे अनाथ झालेलं एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये. त्यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. Supriya Sule appeals government to help COVID 19 orphans
कोरोनामुळे डोक्यावरचं छत्र हरपलेल्या मुलांच्या प्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. राज्यात आणि देशात अनेक मुलांचे पालक कोरोनामुळे दगावल्यानं मुलं अनाथ झाली आहेत. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचं कोरोनानं निधन झाल्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी देखील आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकार घेणार जबाबदारीकोरोना काळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे पालक गमवलेल्या अनाथ मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या १८ व्या वर्षी मासिक सहाय्यता निधी आणि वयाच्या २३ व्या वर्षी पीएम केअर्समधून १० लाख रुपये देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.