राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून आलेले असतानाही कुठलीही संतप्त प्रतिक्रिया न देता संयम आणि माणुसकीचे दर्शन घडविले. एसटी कर्मचारी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी चालून गेले तेव्हा त्यांच्या रोषाला खा.सुप्रिया सुळे सामोऱ्या गेल्या. कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले होते. रेटारेटी करीत होते. त्यांनी सुप्रिया यांना गराडा घातला; पण त्या हात जोडून उभ्या राहिल्या.
कर्मचाऱ्यांना त्या शांत राहण्याची वारंवार विनंती करीत होत्या. गोंधळ करून प्रश्न सुटणार नाहीत. चर्चा केली पाहिजे, त्यासाठी समोर या, असे आवाहनही त्यांनी केले. बळाचा वापर न करता मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभारही मानले.
देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटलेविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीच्या निमित्ताने चर्चेला ऊत आला. मात्र, फडणवीस यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले की वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवीदान समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार सागर मेघे यांना घेऊन फडणवीस राजभवनवर गेले होते.