सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 01:09 PM2019-09-12T13:09:47+5:302019-09-12T13:17:00+5:30
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर एक विचित्र अनुभव आल्याचे सांगत या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांकडे कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर एक विचित्र अनुभव आल्याचे सांगत या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांकडे कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
सुप्रिया सुळेंनी ट्विट करत म्हणटले की, दादर रेल्वे स्थानकावर कुलजीत सिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक ट्रेनमध्ये येऊन टॅक्सी सेवेसाठी विचारणा करत होता. त्याला दोन वेळा नकार देऊनही तो माझा मार्ग अडवत होता. इतकंच नाही, तर निर्लज्जपणे त्याने फोटोसाठीही विचारणा केल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले. तसेच या सर्व प्रकरणानंतर दादर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी तेथील आरपीएफच्या मदतीने त्या टॅक्सी चालकास अटक करुन दंड ठोठविल्याचा मेसेज पोलिसांनी केला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Witnessed a strange experience at Dadar Station. A man by the name of Kuljit Singh Malhotra entered the train and was touting for Taxi service. Despite a refusal twice he blocked my path, harassed me and shamelessly even posed for the photo. (1/3)
— Supriya Sule (@supriya_sule) September 12, 2019
.@RailMinIndia - Kindly Look into the matter so that passengers don't have to experience such incidents again. If touting is permitted under the law, then it cannot and should not be permitted within train stations or airports, and only at DESIGNATED taxi stand.(2/3)
— Supriya Sule (@supriya_sule) September 12, 2019
Post the incidence and on complaining to the rail authorities at Dadar Station & the police,the said tout has been apprehended & fined, as per a message from the RPF police officers.Thank you, RPF for ur prompt action.Inconvenience should not be caused for ANY rail passenger.3/3
— Supriya Sule (@supriya_sule) September 12, 2019
तसेच कायद्यानुसार टॅक्सी सेवेची विचारणा करणाऱ्यांना रेल्वे स्थानकावर आणि विमानतळांवर परवानगी नसल्याचे सांगत केवळ नेमलेल्या टॅक्सी स्टँडवरच अशा प्रकारे सेवेची संमती असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, म्हणजे प्रवाशांना असा अनुभव पुन्हा येणार नाही अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.