राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 01:29 PM2019-08-22T13:29:20+5:302019-08-22T13:44:29+5:30

ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपन्याचा प्रयत्न या सरकारचा आहे.

Supriya sule support of Raj Thackeray family in case of ED investigation | राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई - कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुखराज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी केला आहे. दमानियांच्या या टीकेला आता खुद्द  पवारकन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनीच नाव न घेता उत्तर दिलं आहे.  

ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपन्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. तर, अशा संकटांवेळी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे परिवार राज ठाकरेंसोबत गेला तर कोणी टीका करू नये, असे म्हणत सुप्रिया सुळेंनीअंजली दमानियांच्या टीकेला नाव न घेता उत्तर दिले. बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जीवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली, असे म्हणत राज ठाकरेंच्या समर्थनार्थ त्यांनी आपली बाजू मांडली. तसेच, ईडीची चौकशी म्हणजे सरकारचे दबावतंत्र असल्याचंही सुळे यांनी म्हटले.  

दरम्यान, सहकुटुंब ईडीच्या कार्यालयाकडे निघालेल्या राज ठाकरेंना अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून सवाल विचारला आहे. ''राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? की सहानूभुती गोळा करण्याचा हा प्रयत्न.'' असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray ED Notice Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण

Video : काँग्रेसच्या 'अदृश्य' मतांचा चमत्कार, महायुतीच्या दानवेंसाठी उघडलं विधानपरिषदेचं दार

'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'

Web Title: Supriya sule support of Raj Thackeray family in case of ED investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.