सूरज चव्हाण यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 07:27 AM2024-01-26T07:27:49+5:302024-01-26T07:28:15+5:30
सूरज चव्हाण यांची ईडी कोठडी गुरुवारी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले.
मुंबई : कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यातील आरोपी व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना विशेष न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सूरज चव्हाण यांची ईडी कोठडी गुरुवारी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले. न्या. एम. जी. देशपांडे यांनी चव्हाण यांना ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे चव्हाण यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी रोजी ईडीने अटक केली. त्यांच्या कोठडीत २५ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली होती.