सुरेशदादा, देवकरांसह ४८ आरोपींना शिक्षा आणि दंडही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 02:44 AM2019-09-01T02:44:36+5:302019-09-01T02:44:42+5:30
जळगाव घरकूल प्रकरण; सात वर्षांपर्यंत कारावास, १०० कोटींपर्यंत दंड; धुळे येथील विशेष न्यायालयाचा निकाल
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर तसेच शिवसेनेचे आ. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह ४८ आरोपींना शनिवारी शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष न्यायालयाच्या न्या. सृष्टी नीळकंठ यांनी सकाळी त्यांना दोषी ठरवून दुपारी शिक्षा सुनावली.
या खटल्यातील आरोपींना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा अशी : सुरेशदादा जैन : ७ वर्षे शिक्षा व १०० कोटी रुपये दंड, राजेंद्र (राजा) मयूर : ७ वर्षे शिक्षा व ४० कोटी रुपये दंड, जगन्नाथ (नाना) वाणी : ७ वर्षे शिक्षा व ४० कोटी दंड, प्रदीप रायसोनी: ७ वर्षे शिक्षा व १० लाख रुपये दंड, तेव्हाचे मुख्याधिकारी पी. डी. काळे यांना ५ वर्षे शिक्षा व ५ लाख दंड, माजी मंत्री गुलाबराव देवकर : ५ वर्षे शिक्षा व ५ लाख दंड या शिवाय इतर आरोपींनाही तीन ते पाच वर्ष शिक्षा व आर्थिक दंड सुनावण्यात आला आहे.
न्यायालयात सर्व आरोपी उपस्थित होते. त्यांची हजेरी घेतल्यानंतर न्या. नीळकंठ यांनी आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणी सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपी दोषी असल्याचा निकाल न्या. नीळकंठ यांनी दिला. दुपारी या प्रकरणी सर्व दोषींना त्यांनी शिक्षा सुनावली. जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली होती. ते आता रेल्वे विभागात सचिव आहेत.
आधी जळगाव येथे व नंतर येथील विशेष न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण यांनी तर सर्र्व आरोपींतर्फे अॅड. प्रकाश पाटील, अॅड. अकिल इस्माईल, अॅड. सुशील अत्रे, अॅड. जितेंद्र निळे, अॅड. प्रमोद पाटील, अॅड. एस.के. जैन, अॅड. संजू वाणी, अॅड. सोनार, अॅड. सोनवणे यांनी काम पाहिले. या खटल्याच्या काळात सरकारी वकील अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे निधन झाल्याने सरकारतर्फे
खटल्यात एकूण ५६ आरोपी
जळगाव घरकूल प्रकरणाच्या खटल्यात एकूण ५६ आरोपींचा समावेश होता. त्यापैकी सात आरोपींचा मृत्यू झाला असून एक आरोपी फरार आहे. माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे या माफीच्या साक्षीदार असून त्यांच्यावर स्वतंत्र खटला चालविण्यात यावा, असे न्यायालयानेर् ंनिकालात म्हटले आहे.