सुरेश द्वादशीवार यांच्या ग्रंथास कोठावळे पारितोषिक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:31 AM2019-05-07T07:31:30+5:302019-05-07T07:31:56+5:30

‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या वैचारिक ग्रंथांला यंदाचे केशवराव कोठावळे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

 Suresh Dwashashivar's granthas Kothavale prize | सुरेश द्वादशीवार यांच्या ग्रंथास कोठावळे पारितोषिक जाहीर

सुरेश द्वादशीवार यांच्या ग्रंथास कोठावळे पारितोषिक जाहीर

Next

मुंबई : ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ या वैचारिक ग्रंथांला यंदाचे केशवराव कोठावळे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
१५,१५१ रूपये आणि मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. साधना प्रकाशन, पुणे यांच्या वतीने
हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. मंगळवार २१ मे रोजी मुंबई येथील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू हॉलमध्ये
ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे, असे याबाबत अधिक माहिती देताना पारितोषिकाचे निमंत्रक अशोक कोठावळे यांनी सांगितले.
केशवराव कोठावळे पारितोषिक समितीमध्ये प्रा. उषा तांबे, संजीवनी खेर आणि श्रीराम शिधये यांचा समावेश आहे.
निवडीमागची भूमिका स्पष्ट करताना समितीने म्हटले की, ‘जगाच्या इतिहासात अनेक विचारप्रवाह आले आणि त्यानंतर लुप्तदेखील झाले आहेत. परंतु, गांधीजींच्या विचारांचा प्रभाव अजूनदेखील कायम आहे आणि तो दिवसेंदिवस अधिक वजनदार होताना पाहायला मिळत आहे. महात्मा गांधीजींवर ज्या ज्या नेत्यांनी, विचारवंतांनी आतापर्यंत भाष्य केले आहे त्यांच्या आक्षेपांचे, आरोपांचे लेखकाकडून योग्य प्रकारे खंडन करण्यात आले आहे. त्यासाठी अनेक दाखले, तपशील दिले आहेत. पुस्तकाची भाषा वृत्तपत्रीय, तटस्थ आहे. त्यामुळे गांधीजींचे मोठेपण, वेगळेपण अधिक प्रभावी स्वरूपात समोर येते. आजच्या युगातही ते विचार कसे समर्पक ठरत आहेत ते स्पष्ट होते.

Web Title:  Suresh Dwashashivar's granthas Kothavale prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.