मुंबई, दि. 30 - महामुसळधार पावसानंतर ठप्प झालेली मुंबई रेल्वे आणि गेल्या दहा दिवसांमध्ये झालेल्या चार रेल्वे अपघातानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी एकही ट्विट न केल्याने रेल्वेला वाली कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उत्कल एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजीनामा दिला होता, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच एरवी ट्विटरवर रेल्वे समस्या ऐकून घेणारे सुरेश प्रभू सोशल मीडियावरून गायब असल्याची चर्चा आहे.
मुंबई रेल्वे ब्लॉकबद्दल एकही ट्विट नाहीसुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून रेल्वेत आधुनिकता आल्याची चर्चा गेली तीन वर्षे झाली. केवळ एक ट्विट केले तरी समस्या सोडवली जाते, अशी सोशल मीडियावर आणि प्रवाशांमध्ये सुरेश प्रभू यांची ख्याती आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी मुंबईतील रेल्वेच्या महाब्लॉकबाबत त्यांनी स्वत:हून एकही ट्विट केलेले नाही.
ट्विटरवर अॅक्टिव्ह नाहीत...आपली जबाबदारी म्हणून त्यांनी रेल्वेच्या अधिकाºयांना मात्र काही आदेश दिल्याचे समजते. कारण आतापर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या @RailMinIndia या ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या ट्विटनुसार मुंबईत अडकलेल्या प्रवाशांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश सुरेश प्रभू यांनी दिल्याचे म्हटले आहे. मात्र प्रभू यांनी याबद्दल स्वत:हून एकही ट्विटट केलेले नाही. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर 28 तारखेचे एक ट्विट पिन करून ठेवले आहे. त्यानुसार कोणतीही तक्रार असल्यास जीएम, डीआरएम यांच्याकडे करावी आणि रेल्वेमंत्रालयाला त्यात टॅग करावे असेही म्हटले आहे.
का दिला होता प्रभूंनी राजीनामा?रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारून मोदींकडे राजीनामा देणारे सुरेश प्रभू आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र मोदी यांनी त्यांचा तत्काळ निर्णय न घेता वेटिंगवर ठेवलेला आहे. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तारात रेल्वेमंत्रीपद कोणाला दिले जाऊ शकते, याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
प्रभूंच्या काळात आणखी दोन अपघातप्रभूंनी राजीमाना ज्या कारणांनी दिला त्यात आता आणखी दोन घटनांची भर पडली आहे. मंगळवारी पहाटे आसनगाव स्थानकाजवळ आणखी एक अपघात झाला होता. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ही गाडी रूळांवरून घसरली होती. त्यानंतर दोन दिवस मुंबई रेल्वे ठप्प झाली आहे. या सगळ्यांची जबाबदारी प्रभू स्वीकरणार का आणि त्यांचा राजीनामा आता मोदी मंजूर करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.