१३१ वेळा रक्तदान करणारे सुरेश रेवणकर; कोविड काळातही अविरत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:07 PM2021-10-06T17:07:13+5:302021-10-06T17:07:26+5:30
एखाद्याला रक्तदान करण्यासाठी प्रेरित करणे आणि युवा रक्त दाता तयार करणे त्यांचा उद्देश असून प्रत्येक रक्तदान शिबिरास ते आवर्जून भेट देतात आणि युवक युवतींना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात.
- मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला चांगले प्रतिसाद जनते कडून चांगले प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपर येथील सुरेश रेवणकर हे वयाचा १८ वर्षापासून सतत रक्तदान करत आहे.कोविड काळातही अविरत सेवा करत त्यांनी तीन वेळा रक्तदान आणि चार वेळा प्लेटलेट दान केले आहे. नुकतेच त्यांनी आपले १३१ वी रक्तदान स्वर्गीय जितेंद्र तांडेल ह्यांचा प्रथम स्मृतिदिनी करून आदरांजली वाहिली.
एखाद्याला रक्तदान करण्यासाठी प्रेरित करणे आणि युवा रक्त दाता तयार करणे त्यांचा उद्देश असून प्रत्येक रक्तदान शिबिरास ते आवर्जून भेट देतात आणि युवक युवतींना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करतात. त्यांचे पन्नास हून अधिक रक्तदान व्हॉटॲप ग्रुप खास करून ( घाटकोपर प्रगती मंच सोशल मीडियातून समाज सेवा) चालवत असून त्या माध्यमातून भारतातील अनेक राज्यात गावा गावात गरजूंना रक्त किंवा रक्त दाता उपलब्ध करून अनेकांचे देवदूत बनले आहेत. त्याच प्रमाणे भारत थेलेस्मिया मुक्त व्हावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. लग्ना अगोदर एक वेळा लग्नपत्रिका जुळवले नाही तरी चालेल पण वर वधू ने थेलेस्मिया टेस्टिंग करून घ्यावे जेणेकरून थेलेसमिया मुले जन्माला येणार नाही भविष्या मध्ये हा आजार कुणाला होणार नाही असे मत
त्यांनी व्यक्त केले.
कोविड काळात त्यांनी व त्यांच्या कोविड कृती समिती कोर टीम ने अनेकांना हॉस्पिटल मध्ये बेड, लस तसेच ऑक्सीजन पुरवून आणि प्लाझ्मा मिळवून देवून अनेकांना कोरोना पासून जीवन वाचवले आहे.
अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवणे त्यांचा छंद असून कुठला ही रुग्ण रक्ता साठी दगावू नये यासाठी सतत धडपडणारे सुरेश रेवणकर अनेक प्रशस्ती पत्र ,मानचिन्ह, मिळाले असून आणि पुरस्कार प्राप्त रक्तकर्ण , जागृती रत्न,देवदूत जीवन दाता असे अनेक गौरव पुरस्कार त्यांना मिळाले आहे.
रक्तदान केल्याने काही होत नाही त्याउलट आपल्यामध्ये असलेले आजार शुगर ब्लड प्रेशर ची आगाऊ माहिती आपल्याला प्राप्त होते,आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होऊन ऊर्जा स्पूर्ती प्राप्त होते.म्हणून सर्वांनी वर्षातून किमान चार वेळा करू शकता पण शक्य तितके रक्तदान करावे आणि आपल्या सामजिक बांधिलकी तून माणुसकी जपावे गरजू ला जीवन दान द्यावे आणि सर्वांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करावे असे ते आवर्जून सांगतात.
रक्तदान करणाऱ्याला कमीत कमी महानगर पालिका किंवा राज्य शासनाने निदान प्रोसहान द्यावे आणि प्रेरित करावे , खेळा मध्ये धावा करणाऱ्या ला करोडोची बक्षिसी देणारे सरकार रक्तदानाचे शतक करणाऱ्याला साधी शाबासकी सुद्धा देवू शकत नसल्याची किंव्हा कुठल्याही प्रकारची मदत करत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
लोकमत समूहाचे कौतुक
लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमित्त लोकमत समूहाने गेल्या जुलै महिन्यात रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला होता. कमी वेळात उत्कृष्ठ नियोजन करून महाराष्ट्रात 61000 पिशव्या रक्तसंकलनाचा विक्रम केल्या बद्धल त्यांनी लोकमत समूहाचे विशेष कौतुक केले आहे. आणि मुंबईतील लोकमतच्या अनेक रक्तदान शिबिरांना आपण आवर्जून भेटी दिल्या आणि रक्तदात्यांना प्रोत्साहित केल्याची माहिती त्यांनी दिली.