SurJyotsna Awards 2021: देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी 'डेडिकेट' केलं बॉलिवूडमधील गाणं; तुम्हीच पाहा कोणतं!

By मुकेश चव्हाण | Published: February 16, 2021 07:33 PM2021-02-16T19:33:59+5:302021-02-16T19:40:48+5:30

SurJyotsna Awards 2021: Opposition leader Devendra Fadnavis has dedicated the song "Dost Dost Na Raha" to CM Uddhav Thackeray : राज्य सरकार आणि पोलीस पूजा चव्हाण प्रकरण दाबत आहे, अशी टीकाही देखील देवेंद्र फडणवीसांनी यांनी केली आहे. 

SurJyotsna Awards 2021: Opposition leader Devendra Fadnavis has dedicated the song "Dost Dost Na Raha" to CM Uddhav Thackeray | SurJyotsna Awards 2021: देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी 'डेडिकेट' केलं बॉलिवूडमधील गाणं; तुम्हीच पाहा कोणतं!

SurJyotsna Awards 2021: देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी 'डेडिकेट' केलं बॉलिवूडमधील गाणं; तुम्हीच पाहा कोणतं!

Next

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री किती घट्ट होती, हे वेगळं सांगायची गरज नाही. 'मातोश्री'वर रश्मी वहिनींनी केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीची गोष्ट आपण ऐकलीय, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना पेढे भरवत असल्याचे फोटो आपण पाहिलेत. पण, मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपा-शिवसेनेची युती तुटली आणि या दोन नेत्यांची मैत्रीही. अर्थात, एकमेकांच्या विरोधात फार काही बोलणं हे दोनही नेते टाळतात. मात्र, आज लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या 'जुन्या दोस्ता'साठी एक गाणं आवर्जून डेडिकेट केलं आणि ते बरंच काही सांगून गेलं.

अमृता फडणवीसांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्तेच ट्रोल करतात; 'पतीदेवेंद्र' यांची चपराक

उद्धव ठाकरेंसाठी Uddhav Thackeray एखादं गाणं डेडिकेट करायचं तर कोणतं कराल, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये हसले आणि 'दोस्त दोस्त ना रहा...' हे गाणं त्यांनी डेडिकेट केलं. त्यांच्यासोबत अमृता फडणवीसही होत्या. त्यांना हाच प्रश्न विचारला असता, 'अजिब दास्तां है ये, कहा शुरू कहा खतम...' या ओळी त्यांनी गुणगुणल्या.

पूजा चव्हाण प्रकरण हे सरकार सीबीआयकडे काय देणार; देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

राज्य सरकार आणि पोलीस पूजा चव्हाण  Pooja Chavan प्रकरण दाबत आहे, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी यांनी केली आहे. पूजा प्रकरण सीबीआयकडे सरकारनं द्यायला हवं का याबाबत विचारलं असता फडणवीसांनी जोरदार टीका केली. हे सरकार पोलिसांवरच इतका दबाव आणून प्रकरण दाबतंय. ते सीबीआयकडे काय देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने  बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण असलेल्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस उपस्थित! #SurJyotsnaNationalMusicAwards2021

Posted by Lokmat on Tuesday, 16 February 2021

देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकही असंवैधनिक कृत्य केलेलं नाही, असंही यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच राज्याचं सरकार सारं काही स्वत:च्या मालकीचं असल्यासारखं वागतंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मोठे आरोप केलेत. पोलिस कुठल्यातरी दबावाखाली कारवाई करत आहेत. तसेच माहिती लपवली जाते आहे, असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील केले होते. 

दरम्यान, संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रंगतोय. या सोहळ्यात ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. या सोहळ्यास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित झाले आहेत. 
 

Read in English

Web Title: SurJyotsna Awards 2021: Opposition leader Devendra Fadnavis has dedicated the song "Dost Dost Na Raha" to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.