मुंबई पोलिसांचा सूरमयी "देवा श्री गणेशा"
By मनीषा म्हात्रे | Published: September 27, 2023 04:32 PM2023-09-27T16:32:22+5:302023-09-27T16:32:35+5:30
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात मुंबई पोलिस सेवा देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी मुंबईत जागोजागी ...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवात मुंबई पोलिस सेवा देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक शांतता व सुव्यवस्थेसाठी मुंबईत जागोजागी कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे. गेले काही दिवस बाप्पाच्या सेवेत, बंदोबस्तात तल्लीन झालेल्या पोलीस मंडळींचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मुंबई पोलीस बँडच्या खाकी स्टुडिओने "देवा श्री गणेशा" या गाण्यावर सूरमयी सादरीकरण केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये , “देवा श्री गणेशा!! गेले काही दिवस बाप्पाच्या सेवेत म्हणजेच बंदोबस्तात तल्लीन झालेल्या पोलिस मंडळींचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या मुंबई पोलिस बँडच्या खाकी स्टुडिओचे हे सूरमयी सादरीकरण" असे म्हंटले आहे. याच व्हिडिओला प्रतिसाद देताना "गणपती बाप्पा मोरया” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम… खूपच सुंदर… अंगावर काटा आला…” तर एका युजरने लिहिलेय, “मुंबई पोलिसांचे कौतुक करावे तितके कमी आहे.”
ब्रिटीश काळात किंग जॉर्जच्या रौप्य महोत्सवी वर्षानंतर मुंबई पोलीस बँड पथकाची स्थापना करण्यात आली. पुढे त्यांच्या कलेची दखल घेत १८ डिसेंबर हा पोलीस बँड डे म्हणून घोषित करण्यात आला. ब्रिटीश काळानानंतर मुंबई पोलिसांनी १९५९ पासून स्वत्रंतपणे हे बँड सुरु ठेवले.यापूर्वी मुंबई पोलिसांनीही यापूर्वी श्रीवल्ली गाण्याचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मुंबई पोलीस खाकी वर्दीत ‘श्रीवल्ली’ गाणे सादर करताना दिसत आहेत.
याशिवाय ट्विटर हा व्हिडिओ शेअर करत 'खाकी स्टुडिओ रुकेगा नहीं! असे कॅप्शन लिहले होते. मुंबई पोलीस बँडने याआधीही लता मंगेशकर यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों आणि 'मनी हेस्ट' वेबसिरीजमधील 'बेला सिओ' गाण्यावर परफॉर्म केला होता. वेगवेगळ्या सादरीकरणामुळे पोलिसांचे खाकी स्टुडिओ नेहमीच चर्चेत असतो.