Join us  

शहरातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण सुरू

By admin | Published: January 14, 2016 2:23 AM

शहरात मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहेत. या इमारतींची वारंवार डागडुजी करण्यात येत असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे शहरातील

मुंबई : शहरात मोठ्या संख्येने जुन्या इमारती आहेत. या इमारतींची वारंवार डागडुजी करण्यात येत असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे शहरातील सुमारे ९ हजार इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून, येत्या चार वर्षांत मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारित सुमारे १९ हजार इमारती सेस प्राप्त आहेत. या इमारतींच्या डागडुजीची जबाबदारी म्हाडाची असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. काही इमारती धोकादायक बनल्या असून त्यांच्या डागडुजीचा प्रश्न समोर आला आहे.हजारो इमारती अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत. यापैकी काही इमारती अद्यापही चांगल्या अवस्थेत आहेत, तर काही इमारतींच्या डागडुजीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे गृहनिर्माण विभागाकडून जुन्या इमारतींची परिभाषा ठरविण्यात येत असल्याची माहिती महेता यांनी दिली.मुंबईतील ए, बी आणि सी वॉर्डमधील इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. या इमारतींच्या डागडुजीचा प्रश्न सुमारे २५ वर्षांनंतर निर्माण होईल. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण सुरू आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींच्या डागडुजीसाठी कायद्यामध्ये बदल करून हा अडथळा दूर करण्यात येईल, असे महेता म्हणाले. (प्रतिनिधी)