Join us  

फेरीवाल्यांचे व्हिडीओ शुटींगद्वारे सव्रेक्षण

By admin | Published: December 12, 2014 10:48 PM

व्हीडीओ शूटींगद्वारे सर्वेक्षण करण्याचे निर्देश शुक्रवारी फेरीवाला समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले आहेत.

ठाणो : वारंवार तारीख पे तारीख देऊनही फेरीवाल्यांच्या नोंदणीत अल्पप्रतिसाद लाभल्याने ठाणो महानगरपालिका हद्दीतील फेरीवाल्यांचे येत्या दहा दिवसात व्हीडीओ शूटींगद्वारे सर्वेक्षण करण्याचे निर्देश शुक्रवारी फेरीवाला समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिले आहेत. तसेच नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांना पुढील आठवडय़ात ओळखपत्रंचे वाटप करण्यात येणार आहे.
फेरीवाला धोरण लागू झाल्यावर ठाणो महापालिकेने 5क् हजार अर्ज छापून प्रभाग निहाय फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरु केली होती. मात्र, फेरीवाल्यांनी त्या नोंदणीला अल्पप्रतिसाद दिल्याने आतार्पयत सुमारे 7 हजार फेरीवाल्यांची महापालिकेकडे नोंद झालेली आहे. 
केंद्र, राज्य शासनाच्या नियमानुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे फेरीवाल्याचे सर्वेक्षण व्हीडीओ शूटींगने करून महापालिकेकडे नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांची ओळखपत्र तयार असून पुढील आठवडय़ापासून त्यांना ओळखपत्र देखील देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. महापालिका हद्दीतून जाणा:या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.  (प्रतिनिधी)
 
मुंब्रा रेल्वे स्टेशन ते भारत गिअर हा महामार्गावरील  नागरिकांना आणि रिक्षा चालकांना फेरीवाल्यांच्या त्रसाचा सामना करावा लागत असल्याने मुंबा येथील रिक्षा चालकांनी फेरीवाल्यांच्या विरोधात रिक्षाबंद आंदोलन सुरू केल्याचे सहाय्यक आयुक्त दयानंद गोरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले होते. त्यानुसार हा भाग फेरीवाला मुक्त करताना तेथील व्यवसाय करणा:या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून फेरीवाल्यांकरिता तयार करण्यात आलेल्या हॉकर्स झोन येथे पुनर्वसन केले जाईल असे आयुक्तांनी शेवटी स्पष्ट केले.