Join us

जगण्याचं तंत्र अन् आरोग्याचा मंत्र सांगणार LOKMAT LIFE

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 4:08 AM

आजच्या दगदगीच्या, धावपळीच्या, स्ट्रेसफुल लाईफ स्टाईलमध्ये मजेत, आनंदात जगण्याचं तंत्र शिकवण्यासाठी लोकमत घेऊन आलाय, नवाकोरा, एकदम फ्रेश यू-ट्युब चॅनल ‘लोकमत लाईफ’.

मुंबई : ‘‘जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह...’’, हे जरी खरं असलं तरी आपलं आयुष्य कसं जगायचं, ते सुकर अन् सुखकर कसं करायचं, हे आपल्याच हातात आहे. म्हणूनच, आजच्या दगदगीच्या, धावपळीच्या, स्ट्रेसफुल लाईफ स्टाईलमध्ये मजेत, आनंदात जगण्याचं तंत्र शिकवण्यासाठी लोकमत घेऊन आलाय, नवाकोरा, एकदम फ्रेश यू-ट्युब चॅनल ‘लोकमत लाईफ’.घड्याळाच्या काट्यावर पळत असताना ‘फिट’ राहणं अत्यंत गरजेचं आहे. पण ते कसं राहता येईल, हे अचूक समजायला हवं. सांगणारं कुणीतरी हवं. व्हॉटस्अप विद्यापीठातून हल्ली बरीच माहिती फॉरवर्ड होत असते. पण ती दरवेळी खात्रीलायक असतेच, असं नाही. त्यापेक्षा त्या विषयातील अधिकारी, जाणकार व्यक्तीचं मार्गदर्शन कधीही फायद्याचं ठरू शकतं. नेमकं हेच ‘लोकमत लाईफ’च्या माध्यमातून आम्ही करणार आहोत.आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग, आहार, व्यायाम, आजीबाईंच्या बटव्यातील औषधोपचार ‘लोकमत लाईफ’वर पाहता येतील. खवय्येगिरी आणि भटकंतीसोबतच ब्युटी टिप्स, fashion ट्रेंड्सही तुम्ही पाहू शकाल. पालक आपल्या पाल्यांना बरंच काही शिकवतात, पण त्यांनाही Parentingचे धडे गिरवणं तितकंच आवश्यक आहे. ते काम या चॅनेलवर तज्ज्ञ मंडळी करणार आहेत.‘लाईफ इज अ रेस’च्या आजच्या युगात पळणं गरजेचं आहेच, पण धापा टाकत न धावता एन्जॉय करत धावण्याचं ट्रेनिंग ‘लोकमत लाईफ’वरून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. तेव्हा, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!