Join us

सूर्य काेपला, उष्माघाताचा दुसरा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 8:04 AM

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातदेखील कमाल तापमान कमालीचे वाढल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उष्णतेच्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्र भाजून निघाला असून विदर्भात बुधवारी दुसऱ्या दिवशीही पारा चाळीशी पार होता. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४४.२ सेल्सिअस अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात सारकिन्ही (ता. बार्शीटाकळी) येथे समाधान शामराव शिंदे या ५० वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी गेला. जळगावपाठोपाठ हा राज्यातील दुसरा बळी आहे. वाढच्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिकही कमालीचे हैराण झाल्याचे दिसून येत आहेत. 

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातदेखील कमाल तापमान कमालीचे वाढल्याचे दिसून येत आहे.  बहुतांश ठिकाणी पारा चाळीशी पार आहे. ३१ मार्च आणि १ एप्रिलला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर, २ एप्रिलला मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान आग ओकणारा सूर्य चाकरमान्यांचा घाम काढत आहे. दुपारच्या वेळी लोकांनी घराबाहेर पडणेही बंद केले आहे. 

टॅग्स :मुंबईउष्माघात