सूर्या नदीवरील पूल अर्धवट अवस्थेत
By admin | Published: May 23, 2014 03:21 AM2014-05-23T03:21:33+5:302014-05-23T03:21:33+5:30
मनोर - पालघर परिसरातील सूर्या नदीवरील पुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे.
मनोर : मनोर - पालघर परिसरातील सूर्या नदीवरील पुलाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुलावरुन पाणी आल्यावर पालघरमधील २३० गावांचा संपर्क तुटतो. एकंदर कामाची गती पाहता यावर्षीही पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल, अशी शक्यता नाही. मनोर - पालघर मुख्य रस्त्यावरील सूर्या नदीवरील जुन्या पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळयात नेहमी पूल पाण्याखाली असतो. त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करुन पुलाच्या उंचीचे काम खूप वेळापासून चालू आहे. जेमतेम पुलाचे बेसिक कन्स्ट्रक्शन करण्यात आले आहे. या पुलावर वाहने चढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे काम सुरु नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही काम धीम्या गतीने सुरु आहे. याकडे संबंधित खात्याचे अधिकारी, इंजिनिअर व ठेकेदार यांनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने हे काम रखडले असल्याचा आरोप होत आहे. (वार्ताहर)