सुशांतची आत्महत्या नाही, मग त्याचा हत्यारा कोण? राष्ट्रवादीचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 04:45 PM2021-06-14T16:45:38+5:302021-06-14T17:10:26+5:30

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

Sushant did not commit suicide, so who is his killer? Direct question of the NCP nawab malik to cbi | सुशांतची आत्महत्या नाही, मग त्याचा हत्यारा कोण? राष्ट्रवादीचा थेट सवाल

सुशांतची आत्महत्या नाही, मग त्याचा हत्यारा कोण? राष्ट्रवादीचा थेट सवाल

Next
ठळक मुद्देएक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, जर सुशांतसिंगने आत्महत्या केली नाही, मग त्याचा खूनी कोण? असा सवालही राष्ट्रवादीने विचारला आहे. 

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झालं असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. 

एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
 

Web Title: Sushant did not commit suicide, so who is his killer? Direct question of the NCP nawab malik to cbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.