Join us

Sushant Singh Rajput Case: सीबीआय तपासाचा सिक्वेल; दिल्लीतून पथक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 3:31 AM

Sushant Singh Rajput Case CBI Investigation: सर्व जबाबांची होणार फेरपडताळणी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) दुसऱ्या टप्प्यातील चौकशी सुरू केली आहे. या ‘सिक्वेल’साठी अधीक्षक नूपुर प्रसाद यांच्यासह सहा जणांचे पथक बुधवारी रात्री दिल्लीतून मुंबईत दाखल झाले.पहिल्या टप्प्यातील तपासात नोंदविलेल्या सर्व जबाबांची पडताळणी करून विसंगती शोधली जाईल. त्यातून सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘एम्स’ने सुशांतच्या व्हिसेराची फेरतपासणी करून त्याच्या आत्महत्येवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सीबीआय काहीशी बॅकफूटवर आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील तपासातून अंतिम निष्कर्ष नोंदविला जाणार आहे.सुशांतचा मृतदेह १४ जून रोजी वांद्रे येथील निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्या वेळी त्याचा नोकर दीपेश सावंत, नीरज सिंह, मित्र सिद्धार्थ पिठानी यांनी त्याच्या बेडरूमचे लॉक तोडून मृतदेह खाली उतरवला होता. त्यांच्यासह अन्य उपस्थित आणि मुख्य संशयित असलेली सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक आदींचे सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत. आता त्यातील विसंगती शोधून संबंधितांना आवश्यकतेनुसार चौकशीसाठी बोलावले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.असा होणार दुसऱ्या टप्प्यातील तपासदुसºया टप्प्यातील तपास हा प्रामुख्याने बीकेसीमधील सीबीआयचे मुख्यालय आणि सांताक्रुझमधील डीआरडीओ गेस्ट हाउसमधूनच केला जाईल. नूपुर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकारी स्थानिक पथकाच्या मदतीने तपास पूर्ण करतील.सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध शक्यता पडताळल्या जातील. त्यामध्ये त्याचे डिप्रेशन, व्यसनाधीनता, रियाशी झालेले भांडण, बहिणीशी झालेला संवाद, सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालीयनची आत्महत्या या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग