Sushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणाशी भाजपाचा संबंध काय?; काँग्रेसकडून फडणवीसांचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:06 PM2020-08-28T13:06:00+5:302020-08-28T13:11:45+5:30
Sushant Singh Rajput Case: संदीप सिंहचा भाजपाशी असलेला संबंधाचा तपास करण्याची मागणी
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलिसांकडून सुरू होता. मात्र सुशांतच्या कुटुंबासह विरोधकांनी सीबीआय तपासाची मागणी केली. महाविकास आघाडी सरकार सुशांतच्या गुन्हेगारांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप भाजपानं केला होता. यानंतर आता काँग्रेसनं भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात संदीप सिंहचं नाव पुढे आलं आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंहचा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या प्रकरणातील भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 'सीबीआय ड्रग्ज प्रकरणात संदीप सिंहची चौकशी करणार आहे. संदीप सिंहनं मोदींच्या आयुष्यावरील बायोपिकचा निर्माता होता. त्या चित्रपटाचं पोस्टर देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं होतं,' असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी ट्विटमध्ये पोस्टर लॉन्च कार्यक्रमातील फडणवीसांचा फोटोदेखील शेअर केला आहे.
.@OfficeofUT , @AnilDeshmukhNCP request you to see @BJP4India angle in following request. CBI to qn Mr. Sandeep Singh in drug nexus in #SushantSinghRajputDeathCase . He is a producer of a biopic 'PM Narendra Modi' whose poster was launched by Fadnavis ji.https://t.co/ZmqaXwWCGPhttps://t.co/Ne1lFxZKEupic.twitter.com/7TyO3u2Trn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 28, 2020
सचिन सावंत यांनी फडणवीसांचा फोटो ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 'यामुळेच फडणवीस सरकारनं कोणत्याही चौकशीचे आदेश दिले नाहीत का? संदीप सिंहमुळेच या प्रकरणात घाईघाईनं सीबीआय आणि ईडीला आणलं गेलं का?,' असे प्रश्न सावंत यांनी विचारले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून संदीप सिंहच्या यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे या कनेक्शनची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सावंत यांनी केली.
आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय; याची जबाबदारी कोणाची?; रियाचा सवाल
सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. संदीप सिंहचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होतं. साठपेक्षा अधिक दिवस सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. त्यावेळी या सगळ्याचा तपास का केला नाही?, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. पुण्यातल्या बाणेरमध्ये कोविड रुग्णालयाच्या लोकार्पणासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
आदित्य ठाकरेंबद्दल स्पष्टच बोलली रिया चक्रवर्ती; मोबाईलमधील AU चा अर्थही सांगितला