लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या रिया चक्रवर्ती हिला परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, एका कंपनीच्या इव्हेंटकरिता दुबईला जाण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुभा दिली. सीबीआयच्या लूक आउट नोटीसला हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिल्याने रियाला दिलासा मिळाला आहे.
सुशांत सिंग प्रकरणी रिया विरोधात सीबीआयने लूक आउट नोटीस जारी केली आहे. त्या नोटीसला आव्हान देत २७ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत दुबईला जाण्याची परवानगी मागितली. न्या. कमल खटा आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सीबीआयच्या वतीने बाजू मांडताना ॲड. श्रीराम शिरसाट यांनी बाजू मांडताना सांगितले, रिया संबंधित कंपनीची ब्रँड ॲम्बेसिडर नाही. त्यामुळे तिला परदेशात जाता येईल का याची पडताळणी करत आहोत.
सीबीआयचा दावा फेटाळला
सुशांतसिंगने सप्टेंबर २०२१ मध्ये आत्महत्या केली. त्यासंदर्भातील चौकशीसाठी रियाला बोलावता आले नाही. सीबीआयला मात्र आता चौकशीची आठवण झाली आहे. रियाला मुंबईत काम करण्याचे संबंधित कंपनीने पैसे अदा केले असून रिया दुबईला गेली नाही तर तिला सीबीआय पैसे देणार का? असा प्रश्न विचारत सीबीआयचा दावा खंडपीठाने फेटाळून लावला व रियाला परदेशात जाण्याची परवानगी दिली.