Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 05:50 PM2020-09-06T17:50:52+5:302020-09-06T17:54:31+5:30

सुशांतच्या घरात काम करणाऱ्या दिपेश सावंतची एनसीबीकडून चौकशी

Sushant Singh Rajput Case ncb likely to arrest rhea chakraborty after dipesh sawant records statement | Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार?

Sushant Singh Rajput Case: दिपेश सावंतच्या जबाबानं रियाच्या अडचणी वाढल्या; लवकरच अटक होणार?

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आज मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयानं रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर एनसीबीनं सुशांतच्या घरात काम करणाऱ्या दिपेश सावंतलाही अटक केली. त्याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुशांतची प्रेयसी रियाला अटक होण्याची शक्यता आहे. 

प्रेम करणे गुन्हा असेल तर...;रिया चक्रवर्तीच्या वकीलांचे ‘इमोशनल कार्ड’

एनसीबीच्या पथकानं रात्रभर केलेल्या चौकशीत दिपेश सावंतनं रियाविरोधात जबाब दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रियाच्या सांगण्यावरूनच घरात अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचा जबाब दिपेशनं दिला. दिपेशनं दिलेली ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. यामुळे रियाच्या अटकेची शक्यता वाढली आहे. सध्या एनसीबीच्या पथकाकडून रियाची चौकशी सुरू आहे. तिची चौकशी आधीच्या चौकशीपेक्षा जास्त मुद्देसूद असेल, असं सांगण्यात येत आहे.

रियाच्या इशा-यावर घरी यायचे ड्रग्ज, सुशांतचा स्टाफ दीपेशने दिली कबुली!!

रिया आणि शौविकला दिपेशच्या समोर बसवण्यात येईल. यानंतर तिघांचीही चौकशी करण्यात येईल, अशी माहिती एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी दिली. रिया चक्रवर्तीला न्यायालयात हजर करून तिला कोठडी सुनावण्याची मागणी एनसीबीकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये एनसीबीचा तपास आणखी वेग घेऊ शकतो.

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबईत एनसीबीची कारवाई
रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकनं त्याच्या चौकशीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काही जणांची नावं सांगितली होती. त्यानंतर एनसीबीनं वांद्रे-सांताक्रूझ परिसरात छापे टाकत त्यांची धरपकड सुरू केली आहे. यातील काहींची नावं एनसीबीला शोविकच्या मोबाईल चॅटमधूनही मिळाली आहेत. याआधारे एनसीबीनं कारवाई सुरू केली आहे.

शुक्रवारपासून एनसीबीच्या कारवाईला वेग आला आहे. अंमली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या पथकानं रियासह अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या काहींच्या घरांवर छापे टाकले. या प्रकरणी एनसीबीनं रियाचा भाऊ शोविकसह अन्य सात जणांना अटक केली. यामध्ये सॅम्युअल, करण, कैजान, दीपेश आणि जैद यांचा समावेश आहे. यापैकी एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत दीपेशचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर त्याला याच कलमांतर्गत अटक करण्यात आली.

Web Title: Sushant Singh Rajput Case ncb likely to arrest rhea chakraborty after dipesh sawant records statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.