मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरू होता. मात्र काही स्वार्थासाठी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी त्याबाबत टीका करीत होते, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले. सुशांतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल एम्सने सीबीआयला दिला. त्यामुळे याप्रकरणात विरोधकांकडून मुंबई पोलिसांवर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न असफल ठरला. याबाबत आयुक्त म्हणाले, आम्ही व्यावसायिकदृष्ट्या तपास करीत होतो. कूपर रुग्णालयात त्याचे शव विच्छेदन ही योग्य पद्धतीने करण्यात आले होते. मात्र त्याबाबत काहीही माहिती नसताना काही जणांनी स्वार्थासाठी मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतले. सर्वोच्च न्यायालयाच्या तपासणीमध्ये ही तपासा बाबतकोणताही दोष आढळलेला नाही. १४ जूनला सुशांतसिंह राजपूतने वांद्रे येथील निवासस्थानी आत्महत्या केली. याबद्दल त्याच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे तिची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरूद्ध तक्रार केली. त्यानंतर सीबी0आय, ईडीकडून सबंधिताची कसून चौकशी करण्यात आली. मात्र हत्येच्या अनुषंगाने कोणताही पुरावा मिळाला नाही. सुशांतला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्याला ते रिया, तिचा भाऊ शोविक तसेच सुशांतचा मॅनेजर, नोकर पुरवित होते, त्याबाबत एनसीबीने गुन्हा दाखल करून त्यांच्यासह एकूण १९ जणांना अटक केली आहे.
Sushant Singh Rajput Case: काहींची मुद्दाम पोलिसांवर टीका - आयुक्त परमबीर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:33 AM