सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 07:35 AM2021-02-03T07:35:23+5:302021-02-03T07:35:43+5:30

Sushant Singh Rajput death case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले.

Sushant Singh Rajput death case: Assistant director Hrishikesh Pawar in the custody of NCB | सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार एनसीबीच्या ताब्यात

Next

मुंबई  - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले. अनेक महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
सुशांतसिंहचा जवळचा मित्र व सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेला पवार अनेक महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. सुशांतला तसेच बॉलिवूडमध्ये अनेकांना तो ड्रग्ज पुरवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे. एनसीबीने त्याला चौकशीस अनेकदा समन्स बजावले होते. विविध कारणांनी तो टाळाटाळ करीत होता. एनसीबीच्या पथकाने हृषीकेशच्या चेंबूरच्या घरी छापा टाकला होता. मात्र त्यापूर्वी तो तेथून फरार झाला होता. मंगळवारी त्याला ताब्यात घेऊन बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात नेले. 
     सुशांतसिंहचे ड्रग्जचे व्यसन, त्याची पूर्तता तो कोणाकोणाकडून करीत होता, त्याने कोणाला ड्रग्ज पुरवले, ते काेठून आणले, याबाबत त्याच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात आली.

Web Title: Sushant Singh Rajput death case: Assistant director Hrishikesh Pawar in the custody of NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.