मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईला पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं पाच टीम तयार केल्या आहेत. त्यातील एक टीम वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. सीबीआयचे अधिकारी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं घेणार आहेत. त्यानंतर सीबीआय त्यांच्या पद्धतीनं तपास सुरू करेल.मुंबईत दाखल झालेले सीबीआयचे अधिकारी सध्या गेस्ट हाऊसवर आहेत. या गेस्ट हाऊसवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंध असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला आणण्यात आलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण याची माहिती उपलब्ध झालेली नाही. सीबीआयनं सुशांतचा कूक नीरजशीदेखील संपर्क साधला आहे. त्याचा जबाबदेखील नोंदवला जाणार आहे.
Sushant Singh Rajput Death Case: सीबीआय कामाला लागली; एका अज्ञात व्यक्तीला घेऊन चौकशीसाठी गेस्ट हाऊसवर पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:26 AM