Join us

Sushant Singh Rajput death Case: मानसोपचारतज्ज्ञांसह चार डॉक्टरांचे जबाब नोंदवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 7:18 AM

सुशांतवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी जानेवारी, २०२० पासून तो तिथल्या मानसोपचारतज्ज्ञांच्या संपर्कात होता.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अखेर त्याच्यावर उपचार करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांचा जबाब नोंदविल्याचे समजते. त्यांच्यासह आणखी तीन डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे.

सुशांतवर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यासाठी जानेवारी, २०२० पासून तो तिथल्या मानसोपचारतज्ज्ञांच्या संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवल्याची व त्यांच्यासह आणखी तीन डॉक्टरांचा जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुशांत दोन मानसिक विकारांनी त्रस्त होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर मानसिक उपचार करणाºया मानसोपचारतज्ज्ञांकडे पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र सर्व जबाब नोंदवून झाल्यानंतरच त्यांचा जबाब नोंदविणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानुसार त्यांनी हा जबाब नोंदविला. मात्र मानसोपचारतज्ज्ञांनी पोलिसांना काय सांगितले हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, त्याची प्रेयसी असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याबाबतही पोलीस अधिक माहिती मिळवत आहेत. ती सुशांतच्या पैशांचा वापर करीत आहे का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत