Sushant Singh Rajput Death Case: आदित्य ठाकरेंबद्दल स्पष्टच बोलली रिया चक्रवर्ती; मोबाईलमधील AU चा अर्थही सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 08:12 AM2020-08-28T08:12:25+5:302020-08-28T08:17:06+5:30
Sushant Singh Rajput Death Case: राज्यातील एक तरुण मंत्री सुशांतच्या गुन्हेगारांना वाचवत असल्याचा आरोप सातत्यानं होत आहे.
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीबीआयनं तपास होती घेतल्यापासून दररोज नवीन खुलासे होत आहेत. गेल्या आठवडाभरात सीबीआयनं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीसह कूक नीरजची अनेकदा चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. मात्र रियानं एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यात तिनं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
खूप काही सांगून जातेय सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेलिंग; खुद्द रियानंच दिली महत्त्वाची माहिती
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील गुन्हेगारांना राज्य सरकारमधील एक तरुण मंत्री वाचवत असल्याचा आरोप झाला. विरोधकांनी या संदर्भात आरोप केल्यानंतर पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. मात्र आपण रियाला कधीच भेटलो नसून तिच्याशी कधीही बोलणं झालं नसल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. यावर आता रियानं भाष्य केलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये असलेला AU नावानं सेव्ह असलेला मोबाईल क्रमांक माझी मैत्रीण अनाया उदासचा आहे. तो आदित्य उद्धव यांचा असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र त्यात तथ्य नाही, असं रियानं स्पष्ट केलं.
सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितले; ८ जूनला काय घडलं? रियाचा खुलासा
सुशांतचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला होता. तिथे रिया पोहोचली होती. मात्र ती सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हती. त्याबद्दल विचारलं असता, रियानं सुशांतच्या कुटुंबामुळे अंत्यसंस्काराला न गेल्याचं सांगितलं. 'सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची परवानगी असलेल्या व्यक्तींच्या यादीत माझं नाव नव्हतं. पण बॉलिवूडमधील अनेकांची नावं होती. सुशांतच्या कुटुंबियांनी मी आवडत नाही. त्यामुळे मी तिथे गेले नाही,' असं रियानं सांगितलं.
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण
'मला सुशांतच्या अंत्यसंस्काराला जायचं होतं. पण काही मित्रमैत्रिणींनी मला फोन करून आणि एकानं तर घरी येऊन मला तिथे जाऊ नकोस असं सांगितलं. सुशांतच्या कुटुंबाला तू आवडत नाहीस. तुझं नावदेखील त्या यादीत नाही. तिथे तुझा अपमान केला जाईल. तुला हाकलून देण्यात येईल. तुझी मानसिक स्थिती तशीही चांगली नाही. त्यामुळे तू अंत्यसंस्काराला जाऊ नकोस, असं मित्रमैत्रिणींनी सांगितलं होतं,' अशी माहिती रियानं दिली.