- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित यांनी गुरुवारी पोलिसांकडे प्रसारमाध्यमांविरोधात तक्रार केली. त्यांच्या सांताक्रूझमधील घराला प्रसारमाध्यमांनी गराडा घातला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी मुंबई पोलिसांच्या '१००' नंबरवर कॉल करत पोलिसांना याबाबत कळविले.
सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, तिला याप्रकरणी अटकही केली जाईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यानुसार, रियाचे वडील इंद्रजित राहत असलेल्या त्यांच्या सांताक्रूझ येथील घराला प्रसारमाध्यमांनी गराडा घातला. त्यामुळे इंद्रजित यांनी '१००' क्रमांक डायल करत याबाबत माहिती दिली. त्यानंतर सांताक्रूझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना तिथून हटविले, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यापासून तपासाला वेग आला आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आणि कूक नीरजची चौकशी केली आहे. मात्र, अद्याप सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशी झालेली नाही. आज सीबीआयची कार रियाच्या इमारत परिसरात गेली होती. मात्र कारमधून कोणीही उतरले नाही. प्रसारमाध्यमांनी कारमधील सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार लगेच इमारत परिसरातून बाहेर पडली.
ईडी कार्यालयात जाण्यासाठी संरक्षण द्या- इंद्रजित चक्रवर्तीरियाचे वडील इंद्रजित यांनी ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यासाठी पोलीस संरक्षक मागितले होते. मात्र, ईडीने याबाबत सांताक्रूझ पोलिसांना काही कळवलेले नाही. त्यामुळे याबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही अशी माहिती सांताक्रूझ पोलिसांकडून देण्यात आली.
आणखी बातम्या...
घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...