Sushant Singh Rajput Death Case: बघा, माझ्या घराखाली काय चाललंय; वडिलांची 'ती' ओळख सांगत रियानं शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:45 PM2020-08-27T13:45:10+5:302020-08-27T16:28:30+5:30
Sushant Singh Rajput Death Case: मला आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या; रियाची मुंबई पोलिसांना विनंती
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. सीबीआयनं प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सीबीआय जवळपास आठवड्याभरापासून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र अद्याप सीबीआयनं सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू केलेली नाही. रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना अंमबजावणी संचलनालयाकडून समन्स बजावण्यात आलं. त्यांची आज चौकशीदेखील करण्यात आली. वडील इंद्रजीत चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयातून घरी येत असतानाचा व्हिडीओ रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
खूप काही सांगून जातेय सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेलिंग; खुद्द रियानंच दिली महत्त्वाची माहिती
रियानं तिच्या राहत्या घरातून व्हिडीओ चित्रित केला आहे. त्यात रियाचे वडील इंद्रजीत इमारतीच्या आवारात दिसत आहेत. त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला आहे. 'हा व्हिडीओ माझ्या इमारतीच्या कंपाऊंडमधील आहे. त्या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती माझे वडील इंद्रजीत चक्रवर्ती (निवृत्त लष्करी अधिकारी) आहेत. आम्ही घराबाहेर पडून ईडी, सीबीआय आणि विविध तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय. पण माझ्या आणि कुटुंबाच्या जीविताला धोका आहे,' असं रियानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत म्हटलं आहे.
'आम्ही स्थानिक पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. आम्ही स्वत: तिथे गेलो. पण कोणतीही मदत मिळाली नाही. आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा, असं आवाहन आम्ही तपास यंत्रणांना केलं. पण तरीही मदत मिळाली नाही. आमचं कुटुंब कसं जगणार आहे? विविध तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आम्ही मदत मागत आहोत,' असं रियानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तपास यंत्रणांना योग्य सहकार्य करता यावं यासाठी मुंबई पोलिसांनी कुटुंबाला संरक्षण द्यावं, अशी मागणी रियानं केली आहे.
...म्हणून रियाच्या वडिलांनी केला '१००' डायल!
रियानं सुशांतबद्दल दिली महत्त्वाची माहिती
सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची चौकशी झालेली नाही. मात्र 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीनं रियासोबत बातचीत केली आहे. त्यात तिनं काही महत्त्वाची माहिती दिली आहे. रियानं तिच्यावरील अनेक आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांतसोबतची युरोप ट्रिप, त्यात तो घेत असलेली औषधं, त्याचा ड्रिम प्रोजेक्ट यावर रियानं भाष्य केलं आहे. सुशांत तुझ्यासोबत युरोपला जात असताना सोबत शोविकला का घेऊन आला, या प्रश्नाचं उत्तरही तिनं दिलं आहे.
VIDEO: "रिया माझ्या मुलाला विष द्यायची; ती खुनी आहे, तिला तातडीनं अटक करा"
'सुशांत आणि शोविकमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. शोविक माझी सवत असल्याचं आम्ही कधीकधी थट्टा मस्करी करताना म्हणायचो. पुढे जाऊन असं काही घडेल, असा विचारही त्यावेळी मनात आला नव्हता,' असं रियानं सांगितलं. तिनं सुशांतच्या ड्रिम प्रोजेक्टची आणि त्यामधील भागिदारीबद्दलची माहितीदेखील दिली. 'सुशांत, शोविक आणि मी युरोप टूरला जाण्याआधी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीचं नाव रियॅलिटिक्स (R-H-E-A-L-I-T-Y-X) होतं,' अशी माहिती रियानं दिली.
सुशांतने केले होता रियाच्या युरोप ट्रिपचा खर्च?, समोर आले हे कारण
'सुशांतनं त्याच्या ड्रीम प्रोजेक्टचं नाव माझ्यावरून ठेवलं होतं. सुशांतचा प्रोजेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित होता. ड्रीम प्रोजेक्टचं नाव माझ्या नावावरून ठेव, यासाठी मीच सुशांतवर जबरदस्ती केली, असेही आरोप कदाचित पुढे केले जाऊ शकतील. या कंपनीत मी, सुशांत आणि माझा भाऊ शोविक यांची समान भागिदारी होती. कंपनीत भागीदार होण्यासाठी खात्यातून प्रत्येकाच्या खात्यातून प्रत्येकी ३३ हजार रुपये भरावे लागतात,' अशी माहिती रियानं दिली.
रिया म्हणाली - 'माझी बस एकच चूक झाली', पहिल्यांदाच मीडियासमोर मांडली तिने तिची बाजू!