Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून समन्स; थोड्याच वेळात चौकशीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 10:12 AM2020-08-28T10:12:59+5:302020-08-28T10:36:00+5:30
Sushant Singh Rajput Death Case: रियाच्या चौकशीला साडे दहा वाजता सुरुवात होणार
Next
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी त्याची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावण्यात आलं आहे. रियाला सीबीआयकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. रिया साडे दहा वाजता सीबीआयचा मुक्काम असलेल्या सांताक्रूझमधील अतिथीगृहात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra: #RheaChakraborty leaves from her residence in Mumbai.#SushantSinghRajputDeathCasepic.twitter.com/jteP9iL1zC
— ANI (@ANI) August 28, 2020
गेल्या आठवड्याभरापासून सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजची चौकशी करण्यात आली आहे. गेले सहा दिवस दररोज त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर आता आठवड्याभरानंतर रियाला सीबीआयनं समन्स बजावलं. रिया तिच्या जुहूमधील घरातून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घरातून निघाली. तिच्यासोबत तिचा भाऊ शोविकदेखील गाडीत आहे. थोड्याच वेळात रिया सांताक्रूझमधील डीआरडीओच्या अतिथीगृहात पोहोचेल. त्यानंतर सीबीआयकडून तिची चौकशी सुरू होईल.
आता मलाही आत्महत्या करावीशी वाटतेय; याची जबाबदारी कोणाची?; रियाचा सवाल
'गेल्या काही महिन्यात माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माझ्यावर गंभीर आरोप होत आहेत. मला फाशी देण्याची मागणी होत आहे. मी तर म्हणते, एक बंदूक घेऊन या. माझं कुटुंब रांगेत उभं राहील. गोळ्या घालून संपवा आम्हाला. अन्यथा आम्ही आत्महत्या करतो. मग याची जबाबदारी कोणाची? माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांच्या संपर्कात आल्याचे, अंमली पदार्थ सुशांतला दिल्याचे आरोप माझ्यावर झाले आहेत. यावर मी सध्या काही बोलणार नाही. कारण कदाचित त्याचा परिणाम तपासावर होऊ शकतो,' असं रियानं 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
खूप काही सांगून जातेय सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेलिंग; खुद्द रियानंच दिली महत्त्वाची माहिती
'माझ्या मनात वारंवार आत्महत्येचे विचार येत आहेत. माझ्या संपूर्ण कुटुंबानंच आत्महत्या करायला हवी. नाही तर कोणीतरी गोळ्या घालून आमचा शेवट करावा. अशा प्रकारच्या जगण्याला अर्थ नाही. आमचं मध्यमवर्गीय कुटुंब आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. आज मला ड्रग डीलर म्हटलं जातंय. काल मी खुनी होते. सर्व आरोपांना कोणताही आधार नाही. ते बिनबुडाचे आहेत,' अशा शब्दांत रियानं तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले.
सुशांतनेच स्वप्नात येत मौन सोडण्यास सांगितले; ८ जूनला काय घडलं? रियाचा खुलासा
सातत्यानं होत असलेले निराधार आरोप वेदनादायी असल्याचं रियानं म्हटलं. 'माझ्यावर सतत तथ्यहीन, तर्कहीन आरोप केले जात आहेत. त्यावर मी काय बोलणार? लोक कहाण्या रचून काहीही बोलत आहेत. आरोप करत आहेत. यामुळे मला त्रास होत असल्याचा विचार कोणीही करत नाही. अंकिता लोखंडेसारख्या व्यक्तींच्या मनात जराही सहानुभूती नाही. तुम्ही हव्या तशा कहाण्या रचत आहात. तुम्ही ४ वर्ष बोललादेखील नव्हता. इतक्या सगळ्या लोकांसोबत एकाचवेळी कसं लढायचं, असा प्रश्न मनाला पडतो,' असं म्हणत रियानं तिच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल नाराजी व्यक्त केली.