मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. काल सर्वोच्च न्यायालयानं याबद्दलचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याची राज्य सरकारची भूमिका होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य सरकारला धक्का बसला. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश काल दुपारी सर्वोच्च न्यायालयानं दिला. त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल,' असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांनी आणखी एक ट्विट केलं. 'मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही,' अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दिवसभरात शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. काही दिवसांपूर्वी शरद पवारांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतच्या आत्महत्येच्या सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवारांनी 'नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे,' असं म्हणत पार्थला फटकारलं होतं. त्यामुळे अजित पवारदेखील नाराज झाले. यानंतर काल न्यायालयानं निकाल दिल्यानंतर पार्थ यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं. त्यामुळे या प्रकरणावर पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.पार्थनं काय ट्विट केलंय, कसं आणि का लिहिलंय? याची माहिती नाही; रोहित पवारांची प्रतिक्रियासुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राज्य सरकारची पहिली प्रतिक्रिया; ना बिहार जिंकला ना महाराष्ट्र हरला...सुशांत प्रकरणामुळे अजित पवारांची भाजपाशी जवळीक वाढली?; ‘या’ दोन घटना योगायोग की..."सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, पण..." गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया