Sushant Singh Rajput Suicide: ‘हा’ फोटो निव्वळ योगायोग की आत्महत्येचे संकेत; सुशांत राजपूतच्या ट्विटरवरील पेंटींग कोणाची?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 06:53 PM2020-06-14T18:53:57+5:302020-06-14T18:55:28+5:30
सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरील कव्हर फोटोवर एक जगप्रसिद्ध पेंटिग आहे. ही पेंटिग व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांनी काढली आहे
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने अनेकांना प्रश्न पडले की सुशांतने हे पाऊल का उचललं? सुशांत गेल्या सहा महिन्यापासून मानसिक तणावाखाली होता असं त्याच्या मित्रांकडून पोलिसांना माहिती मिळाली. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या एक्स मॅनेजरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या ५ दिवसानंतर सुशांतने हे टोकाचं पाऊल उचललं. सुशांतच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या ट्विटर प्रोफाईलवरुन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक वेगळं निरीक्षण केले आहे. सुशांतच्या ट्विटर प्रोफाईलवरील कव्हर फोटोवर एक जगप्रसिद्ध पेंटिग आहे. ही पेंटिग व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांनी काढली आहे. व्हिन्सेंट व्हॅन गोघ हे जगप्रसिद्ध चित्रकार होते, त्यांच्या पेंटिंगचे अनेक चाहते होते. त्यांनी बनवलेल्या चित्रामध्ये अनेक भावनांचा समाविष्ट होता. कोणत्याही व्यक्तीच्या थेट ह्दयाला त्यांची पेंटिग भिडत होती. या चित्रकाराचं वैयक्तिक आयुष्य तितकं चांगलं नव्हतं.
ते आपल्या आयुष्यात मानसिक तणावाखाली होते, अनेकदा त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला होता. आयुष्यात त्यांच्या कलेला जो सन्मान मिळणं आवश्यक होता तो कधीच त्यांना मिळाला नाही. आयुष्याच्या ३७ व्या वर्षी मानसिक तणावामुळे त्यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. १८८५ मध्ये व्हॅन यांनी एक पेंटिग बनवली होती त्याचं नाव पोटैटो इटरस असं होतं. गोघ यांच्या मृत्यूनंतर या पेंटिगची चर्चा खूप झाली.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ट्विटरच्या कव्हर पेजला ठेवलेला फोटो म्हणजे द स्टॅरी नाईट ही व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांनी बनवली होती, या जगप्रसिद्ध चित्रकार मानसिक तणावाने त्रस्त होता. छोट्या छोट्या गोष्टीवरुन व्हॅन चिंतेत होते. अखेर मानसिक तणाव सहन न झाल्याने २७ जुलै १८९० मध्ये सकाळी पेंटिग काढता काढता अचानक त्यांनी पिस्तुलीने स्वत:च्या छातीवर गोळ्या झाडल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि व्हिन्सेंट व्हॅन गोघ यांच्या दोघांचा मृत्यू मानसिक तणावामुळे आत्महत्या करुन झाला आहे. अभिनेता सुशांतने त्याच्या ट्विटरवरील फोटोवरुन त्याने आत्महत्या करण्याचे संकेत आधीच दिले होते की, हा फोटो निव्वळ योगायोग आहे या प्रश्नाचं उत्तर कदाचित आता कोणालाही देता येणार नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
‘ती’ बंगाली मुलगी कोण? सुशांत राजपूतच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा, कुटुंबाची मागणी
सुशांतने ‘छिछोरे’मध्ये आत्महत्या न करण्याचा संदेश दिला अन् स्वत:च आत्महत्या केली...!!
एक्स मॅनेजर दिशाच्या सुसाइडच्या वृत्ताने हादरला होता सुशांत आणि नंतर स्वतःच उचलले हे पाऊल