Sushant Singh Rajput Death Case: खूप काही सांगून जातेय सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेलिंग; खुद्द रियानंच दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 12:32 PM2020-08-27T12:32:19+5:302020-08-27T12:32:50+5:30

Sushant Singh Rajput Death Case: सुशांतची ड्रीम प्रोजेक्ट, युरोप टूरबद्दल रिया चक्रवर्तीनं दिली महत्त्वाची माहिती

Sushant Singh Rajput named company from my name spelling says rhea chakraborty | Sushant Singh Rajput Death Case: खूप काही सांगून जातेय सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेलिंग; खुद्द रियानंच दिली महत्त्वाची माहिती

Sushant Singh Rajput Death Case: खूप काही सांगून जातेय सुशांतच्या ड्रीम प्रोजेक्टची स्पेलिंग; खुद्द रियानंच दिली महत्त्वाची माहिती

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यापासून तपासाला वेग आला आहे. सीबीआयनं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी आणि कूक नीरजची चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीची चौकशी झालेली नाही. आज सीबीआयची कार रियाच्या इमारत परिसरात गेली होती. मात्र कारमधून कोणीही उतरलं नाही. माध्यमांनी कारमधील सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार लगेच इमारत परिसरातून बाहेर पडली.

सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची चौकशी झालेली नाही. मात्र 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीनं रियासोबत बातचीत केली आहे. त्यात तिनं काही महत्त्वाची माहिती दिली आहे. रियानं तिच्यावरील अनेक आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांतसोबतची युरोप ट्रिप, त्यात तो घेत असलेली औषधं, त्याचा ड्रिम प्रोजेक्ट यावर रियानं भाष्य केलं आहे. सुशांत तुझ्यासोबत युरोपला जात असताना सोबत शोविकला का घेऊन आला, या प्रश्नाचं उत्तरही तिनं दिलं आहे.

'सुशांत आणि शोविकमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. शोविक माझी सवत असल्याचं आम्ही कधीकधी थट्टा मस्करी करताना म्हणायचो. पुढे जाऊन असं काही घडेल, असा विचारही त्यावेळी मनात आला नव्हता,' असं रियानं सांगितलं. तिनं सुशांतच्या ड्रिम प्रोजेक्टची आणि त्यामधील भागिदारीबद्दलची माहितीदेखील दिली. 'सुशांत, शोविक आणि मी युरोप टूरला जाण्याआधी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीचं नाव रियॅलिटिक्स (R-H-E-A-L-I-T-Y-X) होतं,' अशी माहिती रियानं दिली.

'सुशांतनं त्याच्या ड्रीम प्रोजेक्टचं नाव माझ्यावरून ठेवलं होतं. सुशांतचा प्रोजेक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित होता. ड्रीम प्रोजेक्टचं नाव माझ्या नावावरून ठेव, यासाठी मीच सुशांतवर जबरदस्ती केली, असेही आरोप कदाचित पुढे केले जाऊ शकतील. या कंपनीत मी, सुशांत आणि माझा भाऊ शोविक यांची समान भागिदारी होती. कंपनीत भागीदार होण्यासाठी खात्यातून प्रत्येकाच्या खात्यातून प्रत्येकी ३३ हजार रुपये भरावे लागतात,' अशी माहिती रियानं दिली.

युरोप टूरमध्ये सुशांत घेत होता औषध
विमानात बसण्याआधी क्लोस्ट्रोफोबियाचा त्रास होत असल्याचं सुशांतनं युरोप ट्रिपला जाताना सांगितलं होतं. सुशांत यासाठी एक औषध घेत होता. त्या औषधाचं नाव मोडाफिनी होतं. ते औषध कायम त्याच्यासोबत असायचं. त्यानं विमानात जाण्यापूर्वी ते औषध घेतलं. त्याच्याकडे आधीपासून ते औषध असल्यानं प्रिस्क्रिब्शनची गरज नव्हती, असं रियानं सांगितलं.

Web Title: Sushant Singh Rajput named company from my name spelling says rhea chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.