Join us

Sushant Singh Rajput Suicide: सीबीआय चौकशीचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर- गृहमंत्री देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 5:19 AM

मुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम आहे. या संबंधाने उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले.

नागपूर/मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल आल्यानंतर घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.नागपुरातील पोलिस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले की, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ११ तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढे काय ते ठरवले जाईल. मुंबई पोलिस दलाचा तपास या प्रकरणात अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू असून मुंबई पोलीस दल हा तपास करण्यात सक्षम आहे. या संबंधाने उपस्थित झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचे मात्र त्यांनी टाळले.रियाचा भाऊ शोविकची इडीकडून चौकशीसक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रियाचा भाऊ शोविकची कसून चौकशी सुरू केली आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे सुशांतशी असलेला संबंध व भागीदारीतील कंपनी आणि त्याच्या बँक खात्यावर जमा झालेल्या रकमेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेतली. रियाकडील चौकशीतून शोविकच्या बँक खात्यामध्ये लाखो रूपये असल्याचे स्पष्ट झाले. त्याअनुषंगाने अधिकाºयांनी त्याच्याकडे सविस्तर विचारणा केली. सुशांतचा रूम पार्टनर सिद्धार्थ पिटाणी आणि अन्य काही जणांकडेही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअनिल देशमुखसर्वोच्च न्यायालयगुन्हा अन्वेषण विभाग